‘मन उडू उडू झालं’ ही रिनाची पहिली मराठी मालिका आहे. याविषयी व्यक्त होताना रीना म्हणते की, "‘मन उडू उडू झालं’ ही माझी पहिली मराठी मालिका त्यामुळे मला असं वाटतंय की मी माझ्या मायेच्या, हक्काच्या घरी परत आली आहे आणि फक्त माझ्याच नव्हे तर मी जगभरातल्या सर्व मराठी प्रेक्षकांच्या घरी आली आहे ज्यांना मी आठवड्यातले सलग ६ दिवस भेटणार आहे आणि त्यांच्याच घरातला एक भाग बनणार आहे. तसेच या मालिकेचे दिग्दर्शक मंदार देवस्थळी यांच्याबद्दल खूप ऐकलं होतं, त्यामुळे त्यांच्यासोबत काम करण्याची छान संधी या निमित्ताने मला मिळाली. हृता दुर्गुळेचं काम मी पाहिलं होतं आणि मला आवडलेलं. हृतासोबत आणि इतर कलाकारांसोबत काम करताना मजा येतेय. झी मराठी वाहिनी ही देखील माझ्यासाठी खास संधी आहे कारण या वाहिनीशी प्रत्येक मराठी कुटुंब जोडलं गेलं आहे. तसेच सेटवरील वातावरण अगदी हलकं-फुलकं, प्रसन्न आहे असं वाटतंय जणू वर्क फ्रॉम होम च चालू आहे इतक्या छान पद्धतीने सेटवर सर्वांचा वावर असतो."