Dipika Kakar | दीपिका कक्कर हिची मोठी पलटी, माझा बोलण्याचा चुकीचा अर्थ, टिकेनंतर अभिनेत्रीचे सूर बदलले
टीव्ही अभिनेत्री दीपिका कक्कर ही नेहमीच चर्चेत असते. गेल्या काही वर्षांपासून दीपिका कक्कर ही मोठ्या पडद्यापासून दूर आहे. मात्र, असे असतानाही दीपिका कक्कर ही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांच्या संपर्कात आहे. दीपिका कक्कर ही अनेकदा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर देखील असते.
Follow us
दीपिका कक्कर हिने 2018 मध्ये शोएब इब्राहिम याच्यासोबत लग्न करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. दीपिका कक्कर ही लग्न झाल्यापासून मोठ्या पडद्यापासून तशी दूर आहे. जुलै महिन्यात दीपिका कक्कर आणि शोएब आपल्या पहिल्या बाळाचे स्वागत करणार आहेत.
दीपिका कक्कर हिने नुकताच एक मुलाखत दिली होती या मुलाखतीमध्ये दीपिका कक्कर हिने म्हटले होते की, मी आता परत कधीच अभिनय क्षेत्रामध्ये पदार्पण करणार नाहीये.
दीपिका कक्कर हिचे हे बोलणे ऐकून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. मात्र, आता दीपिका कक्कर हिने मोठी पलटी मारली आहे. नुकताच दीपिका कक्कर हिने अजून एक मुलाखत दिलीये.
या नव्या मुलाखतीमध्ये दीपिका कक्कर म्हणाली की, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ हा घेतला गेला. मला असे अजिबात म्हणायचे नव्हते. मला माझ्या बाळाला अधिक वेळ द्यायचा आहे.
दीपिका कक्कर पुढे म्हणाली की, मी बरीच वर्ष मालिकांमध्ये काम केले आहे. यामुळे मी ब्रेक घेतला आहे. बाळ झाल्यावर मला चांगली मोठी आॅफर मिळाली तर मी नक्कीच काम करेल.