PHOTO | 30 नोव्हेंबरला या वर्षाचे शेवटचे चंद्रग्रहण; जाणून घ्या खास गोष्टी
या वर्षीचे हे शेवटचे चंद्रग्रहण 30 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजून 4 मिनिटांनी दिसायला सुरुवात होईल. त्यानंतर हे ग्रहण रात्री 5 वाजून 22 मिनिटांपर्यंत पाहता येईल.

या वर्षीचे शेवटचे चंद्रग्रहण 30 नोव्हेंबरला दिसेल. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण कार्तिकी पौर्णिमेला दिसेल.
- या वर्षीचे शेवटचे चंद्रग्रहण 30 नोव्हेंबरला दिसेल. विशेष म्हणजे हे चंद्रग्रहण कार्तिकी पौर्णिमेला दिसेल.
- या वेळेचं चंद्रग्रहण हे उपछाया चंद्रग्रहण आहे.
- उपछाया चंद्रग्रहण म्हणजे ग्रहण सुरु होण्याआधी चंद्र पृथ्वीच्या सावलीत प्रवेश करतो. याला चंद्र मालिन्य म्हणतात. यानंतर चंद्र पृथ्वीच्या वास्तवातील सावलीत प्रवेश करतो. यावेळी खऱ्या अर्थाने ग्रहण सुरु होते.
- उपछाया ग्रहणावेळी चंद्राची प्रतिमा केवळ अंधूक होते, पूर्ण काळी होत नाही. या अस्पष्टपणाला सामान्य स्थितीत पाहता येत नाही. म्हणूनच या ग्रहणाला उपछाया चंद्रग्रहण म्हटले जाते.
- या वर्षीचे हे शेवटचे चंद्रग्रहण 30 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजून 4 मिनिटांनी दिसायला सुरुवात होईल. त्यानंतर हे ग्रहण सायंकाळी 5 वाजून 22 मिनिटांपर्यंत पाहता येईल.
- हे चंद्रग्रहण आशिया खंडातील काही देशांमध्ये दिसेल. तसेच अमेरिकेच्या काही भागातही हे चंद्रग्रहण पाहता येईल.