दररोज एक तास चालण्याने आपले वजन कमी होण्यास मदत होते. चालणे हा एक असा व्यायाम आहे, ज्यामध्ये आपल्याला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीची गरज लागत नाही. चालताना मन शांत आणि मुड चांगला करण्यासाठी आपण गाणे देखील ऐकू शकतो.
कुढल्याही प्रकारचा खेळ खेळल्याने आपल्या शरीराचा व्यायाम होतो. त्यामुळे आपण तंदुरुस्त राहू शकतो. परंतु सध्याच्या जीवनशैलीमध्ये आपल्याकडे खेळण्यासाठी वेळच राहिला नाही. मात्र, वेळ काढून आपण क्रिकेट, फुटबॉल, बास्केटबॉल सारख्या खेळ खेळले पाहिजेत. यामुळे तुमची मनःस्थिती चांगली राहते आणि तुम्ही तंदुरुस्त राहता.
जर आपल्याला पोहायला येत असेल तर आपण दररोज अर्धा तास तरी पोहले पाहिजे. पोहणे हा एक चांगला व्यायाम आहे. यामुळे तुमचे वजन वेगाने कमी होईल.
आजकाल झुम्बाचा व्यायाम करण्यावर अधिक भर दिला जातो. झुम्बा केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. झुम्बा आपण कोणत्याही वेळला करू शकतो.
जर आपण घराबाहेर जाऊन व्यायाम करू शकत नसतोल तर आपण दोरीवरच्या उड्या मारून वजन कमी करू शकतो. दोरीवरच्या उड्यांमुळे वजन कमी होण्यास मदत होते.