सिलेंडर ते मोबाईल रिचार्ज; या पाच गोष्टी खरेदी केल्यास मिळतो मोफत इन्शुरन्स
Insurance Cover | आपण दैनंदिन जीवनात काही गोष्टी खरेदी करतो त्यावर मोफत विम्याची सुविधा असल्याची बाब अनेकांना माहिती नसते. याविषयी योग्य माहिती असल्यास तुम्ही विम्याचा फायदा घेऊ शकता.
Follow us
तुम्ही एखाद्या सिस्टमॅटिक इन्व्हेसमेंट प्लॅनमध्ये (SIP) गुंतवणूक करता तेव्हा तुम्हाला विम्याचा लाभ मिळतो. एसआयपी प्लस म्हणून हा विमा ओळखला जातो.
तुम्ही घरगुती गॅस सिलेंडर विकत घेता तेव्हा त्यासोबत तुम्हाला मोफत पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर मिळतो.
अनेक बँकांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डावर 10 लाखांचा इन्शुरन्स कव्हर दिला जातो. यामध्ये पर्सनल अॅक्सिडेंट कव्हर, पर्चेस प्रोटेक्शन कवर आणि पर्मनंट डिसएबिलीट कव्हरचा समावेश असतो.
तुम्ही एअरटेल कंपनीचे सीमकार्ड वापरत असाल तर तुम्हाला मोबाईल रिचार्जवर फ्री टर्म इन्शुरन्स मिळू शकतो. एअरटेलच्या 279 आणि 179 रुपयांच्या रिचार्जवर ही ऑफर उपलब्ध आहे.
भविष्य निर्वाह निधी खाते असणाऱ्या नोकदारांनाही 7 लाखांचा इन्शुरन्स कव्हर मिळतो.