रंगपंचमी खेळताना केस अन् त्वचेची काळजी कशी घ्याल? लोकप्रिय अभिनेत्रींकडून टिप्स

रंगपंचमी खेळताना तुमच्या लाडक्या नायिका त्यांच्या त्वचेची आणि केसांची काळजी कशी घेतात, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर इथे त्याचं उत्तर आहे. झी मराठी नायिकांनी त्यांच्या चाहत्यांसोबत या खास टिप्स शेअर केल्या आहेत.

| Updated on: Mar 22, 2024 | 12:49 PM
अभिनेत्री तितिक्षा तावडे म्हणाली, "जेव्हा मी ठरवून होळी खेळायला जाते तेव्हा त्वचेवर आणि केसांना खोबरेल तेल लावून जाते.  त्याने रंग लगेच निघतो आणि कमी त्रास होतो. मी नेहमी नैसर्गिक रंगांनीच होळी खेळते."

1 / 6
'नवरी मिळे हिटलरला'मधली वल्लरी विराज सांगते, "मी होळी खेळायला जाण्याआधी बेबी ऑइल किंवा खोबरेल तेल लावते. ज्याने रंग त्वचेवर चिटकून राहत नाही. केसांनाही तेल लावते आणि छान एक वेणी, बन किंवा पोनी बांधते. होळी खेळून आल्यावर अंघोळ करून  क्रीम लावते. जर रंग निघत नसेल तर  लिंबू लावून रंग काढायचा प्रयत्न करते."

2 / 6
'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत वसुंधराची भूमिका साकारणारी अक्षया हिंदाळकर म्हणाली, "लहानपणी होळी खेळायला जायची तेव्हा मला लक्षात आहे की  माझी आई मला बसवून केसांना भरभरून तेल लावायची. त्यानंतर केस बांधायची आणि त्वचेवर तेल, क्रीम किंवा सनस्क्रीन लावायची. मोठी झाल्यानंतर माझं होळी खेळणं कमी झालं. मला काही रंगांची अॅलर्जी आहे म्हणून आम्ही ऑरगॅनिक रंगांचा वापर करायचो."

3 / 6
'सारं काही तिच्यासाठी' मालिकेतील निशी म्हणजेच दक्षता जोईल सांगते, "मी जेव्हा लहानपणी मैत्रिणींसोबत होळी खेळायचे तेव्हा माझी आई नेहमी मला तेल लावून पाठवायची. कारण तेव्हा खूप भयानक रंग वापरले जायचे. सोनेरी, भडक रंग, काही जण तर ऑइल पेंटही लावायचे. म्हणून आई खूप तेल लावून मला बाहेर पाठवायची. होळी  खेळून झाल्यावर अंघोळ केल्यानंतर क्रिम किंवा तेल लावते. कारण सतत पाण्यात राहिल्यामुळे त्वचा आणि केस कोरडे होतात."

4 / 6
'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेतील शिवानी नाईक म्हणाली, "होळी हा माझा आवडता सण आहे. लहानपणी होळीच्या रात्री मी झोपायचीच नाही, आम्ही सर्व गच्चीत  फुगे बनवणे आणि रंगाचे पाणी तयार करणे, कोरडे रंग एका ताटात काढणे  हा सर्व कार्यक्रम सोसायटीच्या गच्चीवर चालू असायचा. आई-बाबा नेहमी सांगायचे की डोक्यापासून पायाच्या बोटापर्यंत तेल लावून जा. मला वाटतं हा उपाय घरोघरी वापरला जातो. कारण यामुळे रंगपंचमी खेळून आल्यावर फार त्रास होत नाही."

5 / 6
'पारू'मधली शरयु सोनावणे म्हणाली, "लहानपणी जसं मनाला येईल तसं होळी खेळायचे कुठचे ही रंग वापरायचो, कोणत्याही पाण्यात होळी खेळायचो. पण जेव्हापासून मला कळायला लागेल तेव्हा पासून होळी खेळणं मी बंद केलंय. रंगांचा प्राण्यांना त्रास होतो. माझ्या घरी असलेल्या पाळीव श्वानालाही ते सहन होत नाही. त्यामुळे मी होळी खेळणं बंद केलं. पण रंगाचा टिळा मी नक्की लावते. मी सर्वाना सांगू इच्छिते की होळी खेळताना तुम्ही प्राण्यांची काळजी घ्या."

6 / 6
Follow us
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.