स्वर्गमंडप, 108 खांब, अप्रतिम रचना.. कोल्हापुरातील या मंदिराला एकदा तरी भेट नक्की द्या!

या मंदिरातील महादेवाचं नाव कोपेश्वर असं आहे. कोपेश्वर म्हणजेच रागावून याठिकाणी येऊन बसलेला. सतीच्या विरहाने कोपलेला असा महादेव कोपेश्वर. त्यांची समजूत काढण्याचं काम विष्णूंनी केलं. म्हणून त्यांचं नाव धोपेश्वर. म्हणूनच या मंदिरात दोन शाळुंका आहेत.

| Updated on: Jan 25, 2024 | 1:49 PM
भारतातील असंख्य मंदिरांमध्ये स्थापत्यशास्त्राचे अप्रतिम नमुने पहायला मिळतात. हजारो वर्षांपूर्वी बांधकाम केलेल्या लेण्या, मंदिरं आजही डौलानं उभी असल्याचं दिसून येतं. कोल्हापुरातील शिरोळ तालुक्यात असलेल्या खिद्रापूर गावातील कोपेश्वर मंदिरसुद्धा अशाच स्थापत्यकलेचा अप्रतिम नमुना आहे.

1 / 5
कृष्णा नदीच्या काठी वसलेल्या या कोपेश्वर मंदिरात महादेव म्हणजेच शंकर आणि विष्णू या दोघांची पूजा केली जाते. 1109 ते 1178 या काळात हे मंदिर बांधलं गेलंय. त्यामुळे तब्बल 900 वर्षे जुन्या असलेल्या या मंदिराला भारतीय संस्कृतीचा अद्भुत वारसा लाभला आहे.

2 / 5
या मंदिराची रचना अत्यंत सुंदर असून हत्तींनी आपल्या पाठीवर  हे मंदिर उचलून घेतलंय, असं त्यातून दर्शवण्यात आलं आहे. कोपेश्वर मंदिरात एकूण 108 खांब आहेत. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथला स्वर्गमंडप.

या मंदिराची रचना अत्यंत सुंदर असून हत्तींनी आपल्या पाठीवर हे मंदिर उचलून घेतलंय, असं त्यातून दर्शवण्यात आलं आहे. कोपेश्वर मंदिरात एकूण 108 खांब आहेत. या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे इथला स्वर्गमंडप.

3 / 5
या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे इथे शिवलिंगासमोर नंदी नाही. आक्रमकांमुळे किंवा कालौघात या नंदीचं स्थलांतर झालं असावं. हा नंदी खिद्रापूरपासून जवळपास 12 किमी दूर कर्नाटकातील यडूर गावी आहे. तिथं केवळ नंदीचं मंदिर आहे. नंदीचं स्वतंत्र मंदिर असलेलं कदाचित हे दुर्मिळ उदाहरण असावं.

4 / 5
'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटातील 'शिव भोला भंडारी' या गाण्याचं शूटिंग या मंदिरात झालं आहे. केवळ आतूनच नाही तर बाहेरूनही हे मंदिर सुंदर अशा कोरीव कामाने परिपूर्ण आहे.

'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटातील 'शिव भोला भंडारी' या गाण्याचं शूटिंग या मंदिरात झालं आहे. केवळ आतूनच नाही तर बाहेरूनही हे मंदिर सुंदर अशा कोरीव कामाने परिपूर्ण आहे.

5 / 5
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.