जेजुरी गडावर भंडाऱ्याची उधळण, खंडेरायाचं सुंदर रूप बघा…गाभाऱ्यातली मनमोहक दृश्य बघा!
अभिजीत पोते, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, पुणे : सोमवती अमावस्ये निमित्त जेजुरी गड भक्तांनी फुलला. नगर प्रदिक्षणा करत देवाची पालखी कऱ्हा स्नानासाठी जाणार. खंडेरायाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर गर्दी. यळकोट यळकोट जय मल्हार च्या जयघोषाने जेजुरी गड दुमदुमला. जेजुरी गडावर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळालीये. सोमवती अमावास्येला खंडेरायाची पालखी नगर प्रदक्षिणा करत कऱ्हा स्नानासाठी जाते. या फोटो मध्ये बघा जेजुरी गडावर भाविकांनी आज प्रचंड गर्दी केलीये.
Most Read Stories