अनेकजणांसोबत अफेअर, पहिल्या लग्नानंतर 2 वर्षात घटस्फोट; दुसऱ्या लग्नाआधीच बनली आई, अभिनेत्रीच्या बऱ्याच चर्चा
बॉलिवूडमध्ये अफेअर अन् घटस्फोट , एकापेक्षा जास्त लग्न वैगरे या गोष्टी काही नवीन नाही. अशीच एक अभिनेत्री आहे जिच्या अफेअर्सपासून ते लग्नाआधीच आई बनण्यापर्यंतच्या बऱ्याच चर्चा आहेत.
Follow us
बॉलिवूडमध्ये अफेअर अन् घटस्फोट काही नवीन नाही. अनेकांच्या लग्नाच्या आणि घटस्फोटच्या चर्चा होतच असतात.
अशीच एक अभिनेत्री आहे जिच्या अफेअर्सपासून ते लग्नाआधीच आई बनण्यापर्यंतच्या बऱ्याच चर्चा आहेत
ही अभिनेत्री आहे कल्की कोचलिन. कल्की तरुणपणी अनेकांसोबत रिलेशनशिपमध्ये होती. नुकतंच एका मुलाखतीत तिने याबाबत सांगितलं की, “लग्न आणि मूल झाल्यानंतर या सगळ्यासाठी वेळच मिळत नाही. पण मी अशा लोकांना पाहिलं आहे जे एकावेळी अनेकांसोबत रिलेशनशिपमध्ये असतात. अशावेळी त्यांनी एक सीमा ठरवलेली असते.”
कल्कीचे दोन लग्न झाली आहेत. पहिलं लग्न दिग्दर्शक अनुराग कश्यपसोबत आणि दुसरं लग्न बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गसोबत
कल्की मूळ फ्रान्सची आहे. कल्की फ्रान्सवरुन भारतात आली आणि तिने हिंदू धर्म स्वीकारला. तिने उटीमध्ये शिक्षण घेतलं. १८ वर्षांची असताना ती लंडनला गेली. तिथे तिने थिएटर आणि ड्रामाचं शिश्रण घेतलं.
त्यानंतर कल्की पुन्हा भारतात आल्यावर तिने अनुराग कश्यपच्या ‘देव डी’ सिनेमासाठी ऑडिशन दिली आणि तिची निवड झाली. याच सिनेमावेळी दोघं प्रेमात पडली.
कल्की आणि अनुराग यांनी 2011 मध्ये लग्न केलं. अनुराग कल्कीपेक्षा 14 वर्षांनी मोठा आहे. मात्र लग्नानंतर दोन वर्षातच त्यांच्यात खटके उडायला सुरुवात झाली. अखेर 2015 मध्ये त्यांनी घटस्फोट घेतला.
कल्की लग्नाआधीच आई झाल्याच्याही बऱ्याच चर्चा रंगल्या. 7 फेब्रुवारी 2020 रोजी कल्कीने एका गोंडस मुलीला जन्म दिला
तेव्हा बॉयफ्रेंड गाय हर्शबर्गसोबत ती रिलेशनशिपमध्ये होती. लग्नाआधीच मूल जन्माला आल्याने तिला खूप ट्रोल केलं गेलं. मात्र नंतर तिने सांगितलं की त्यांचं लग्न झालं आहे.