Marathi News Photo gallery Kareena Kapoor and Saif Ali Khan son Taimur Ali Khan study in Dhirubhai Ambani International School know his fees
देशातील सर्वांत महागड्या शाळेत शिकतो तैमुर; एका महिन्याची फी ऐकून तुमचेही डोळे विस्फारतील!
करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा तैमुर हा देशातील सर्वांत महागड्या शाळेत शिक्षण घेतोय. त्याच्या शाळेची फी ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. तैमुरच्या या शाळेत बॉलिवूडचे इतरही स्टारकिड्स शिक्षण घेतात. त्यात अबराम खान, आराध्या बच्चन यांचाही समावेश आहे.
तैमुर अली खानImage Credit source: Instagram
Follow us
अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मोठा मुलगा तैमुर अली खानने लहानपणापासूनच सर्वांचं लक्ष वेधलं. तैमुर जिथे कुठे जाईल, तिथे पापाराझींचे कॅमेरे त्याच्या अवतीभोवती आवर्जून पहायला मिळतात. एखाद्या सेलिब्रिटीइतकंच त्याचं स्टारडम आहे.
तैमुरचं शिक्षणसुद्धा देशातल्या प्रतिष्ठित आणि सर्वांत महागड्या शाळेत होत आहे. या शाळेची फी ऐकून तुम्हीसुद्धा थक्क व्हाल. बॉलिवूडच्या इतर स्टारकिड्सप्रमाणेच तैमुरसुद्धा मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतो.
धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलची स्थापना 2003 मध्ये झाली. शाळेत तैमुर हा शिक्षकांचा लाडका विद्यार्थी असून तो अभ्यासाव्यतिरिक्त इतर बऱ्याच करिक्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये आवर्जून भाग घेतो.
काही रिपोर्ट्सनुसार तैमुरच्या शाळेची फी तब्बल 1 लाख ते 20 लाख रुपयांदरम्यान आहे. फ्री स्ट्रक्चर वेगवेगळ्या क्लासेससाठी वेगळी आहे.
एलकेजी क्लासपासून सातवीपर्यंत महिन्याची फी 1.70 लाख रुपये आहे. तर क्लास 8 वी ते 10 वीपर्यंत विद्यार्थ्यांची फी 4.48 लाख रुपये आहे. एकरावी आणि बारावीतल्या विद्यार्थ्याची फी जवळपास 9.65 लाख रुपये इतकी आहे.
करीना आणि सैफ हे तैमुरच्या शाळेच्या फीसाठी दर महिन्याला 1.70 लाख रुपये आणि वर्षाला 20.40 लाख रुपये खर्च करतात. या शाळेत तैमुरसह शाहरुख खानचा मुलगा अबराम, ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनची मुलगी आराध्या, करण जोहरची दोन्ही मुलं शिकतात.