हिवाळ्याचे दिवस सुरू झाले असून या काळात बऱ्याच जणांना सर्दी-खोकल्याचा त्रास होऊ शकतो. खोकल्याचे अनेक प्रकार असतात, जसा कफयुक्त खोकला किंवा कोरडा खोकला. खोकला होण्याची अनेक कारणे असू शकतात. थंडीच्या दिवसांत लहान मुलांना खोकला होऊ शकतो. अशा वेळी आपण त्यांना कफ सिरप देतो. मात्र तरीही त्यांचा खोकला वाढत असेल तर त्यांना तत्काळ डॉक्टरांकडे न्यावे.