‘लागीरं झालं जी’ची शीतली अन् ‘सहकुटुंब सहपरिवार’चा पश्या यांची नवी मालिका

स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती रणजीत ठाकूर आणि हेमंत रुपारेल यांच्या फ्रेम्स प्रोडक्शनची आहे. अजय कुरणे या मालिकेचं दिग्दर्शन करणार असून अनेक दिग्गज कलाकार मालिकेतून भेटीला येतील.

| Updated on: Feb 12, 2024 | 1:44 PM
स्टार प्रवाह वाहिनीवर 'साधी माणसं' ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जगात चांगली आपली सांगली असं आत्मविश्वासाने मिरवणाऱ्या सांगली शहरात या मालिकेची गोष्ट घडते. मीरा आणि सत्या या गोष्टीतली दोन मुख्य पात्र.

1 / 7
एकाच गावात राहत असले तरी स्वभाव मात्र टोकाचे. मीरा स्वभावाने अतिशय सकारात्मक, सहनशील आणि संपूर्ण कुटुंबाचा विचार करणारी. घरची परिस्थिती बेताची असली तरी हेही दिवस सरतील असा आत्मविश्वास बाळगणारी. तर सत्या आणि नशिबाचा 36 चा आकडा आहे.

2 / 7
डॉक्टर व्हायचं त्याचं स्वप्न होतं पण गॅरेजमध्ये मेकॅनिकचं काम करतो. स्वत:च्या धुंदीत राहणारा तो आहे. अशा या विभिन्न स्वभावाच्या मीरा आणि सत्यामध्ये नियती नेमका कोणता खेळ करणार याची गोष्ट म्हणजे साधी माणसं ही मालिका.

3 / 7
स्टार प्रवाह वाहिनीचे बिझनेस हेड यांच्या संकल्पनेतून स्टार प्रवाहच्या मालिकांचे शीर्षक आकाराला येतात. साधी माणसं ही मालिका देखिल त्यापैकीच एक. मालिकेचं नाव नेमकं त्यांना कसं भावलं हे सांगताना सतीश राजवाडे म्हणाले, "साध्या गोष्टी साधी माणसं नेहमी मनाला भिडतात. साधी माणसं मालिकेची गोष्ट नावाप्रमाणेच आहे."

4 / 7
"साधं रहाणीमान पण मोठी स्वप्न पूर्ण करताना समोर येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीला ते कसं न हरता सामोरं जातात आणि जगतात. अशा प्रेमळ माणसांची असामान्य गोष्ट साधी माणसं या मालिकेच्या माध्यमातून रसिकांसमोर मांडण्याचा प्रयत्न आहे," असं त्यांनी सांगितलं.

5 / 7
अभिनेता आकाश नलावडे ही नवी भूमिका साकरण्यासाठी खूपच उत्सुक आहे. "पश्या या माझ्या भूमिकेला खूप प्रेम मिळालं. या भूमिकेने मला घराघरात पोहोचवलं. तेच प्रेम सत्यालाही मिळेल ही अपेक्षा आहे. या मालिकेतला माझा लूकही खूप वेगळा आहे," असं आकाश म्हणाला.

6 / 7
सुप्रसिद्ध अभिनेत्री शिवानी बावकर आणि सहकुटुंब सहपरिवार या मालिकेतून घराघरात पोहोचलेला पश्या म्हणजेच लोकप्रिय अभिनेता आकाश नलावडे या मालिकेत मीरा आणि सत्याची भूमिका साकारणार आहेत.

7 / 7
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.