पोटात गॅस झालाय? पोटातली Acidity दूर करणारी 5 पेय , ज्यानं मिटेल सगळी चिंता!
Acidity relief tips: चुकीच्या खानपान सवयी पद्धतीमुळे अनेकदा आपले पोट खराब होऊन जाते. अनेकदा पोटाच्या वेगवेगळ्या समस्या त्रास देतात, यातील एक समस्या म्हणजे पोटाची ऍसिडिटी. बहुतेक वेळा आपल्या पोटामध्ये गॅस जमा होतो. या समस्याला आपण घरच्या घरी सुद्धा बरे करू शकतो म्हणून आज आपण अशा काही 5 पेयांबद्दल जाणून घेणार आहोत,जे तुमचे पोट बरे करते.
![पोटातील ॲसिडिटी दूर करण्यासाठी थंड दूध अत्यंत लाभदायक ठरते. हे दूध योग्य पद्धतीने सेवन करण्यासाठी रात्री झोपण्याआधी एक ग्लासभर थंड दूध आपल्याला प्यायचे आहे.काही दिवस सातत्याने असे केल्यास तुमची ॲसिडिटी ची समस्या मुळापासून दूर होऊन जाईल.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/02/23025530/Health-acidity-01.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![आपल्या पोटातील गॅस नष्ट करण्यासाठी जीरा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. जेवण झाल्या नंतर भाजलेले जिरे आपण नेहमी खाल्ले तर आपल्या पोटाच्या अनेक समस्या दूर होतात तसेच रात्री झोपताना एक ग्लासभर पाण्यामध्ये जिऱ्याची पावडर मिक्स करून हे पेय प्यायल्याने पोटातील गॅस दूर होतो तसेच अपचन ऍसिडिटी पासून बरे वाटते.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/02/23025535/Health-acidity-02.jpg)
2 / 5
![लिंबू मध्ये भरपूर प्रमाणामध्ये ऍसिडची मात्रा असते.हे पदार्थ पोटातील ॲसिडिटी दूर करते. एक ग्लासभर पाण्यामध्ये एक चमचा मध मिसळावा आणि यामध्ये अर्धा लिंबू पिळा.या दोन्ही पदार्थ पासून बनवलेले पेय आपण सेवन केले तर आपल्याला ऍसिडिटी पासून लगेच सुटका मिळते.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/02/23025539/Health-acidity-03.jpg)
3 / 5
![ओवा आणि काळे मीठ
हे दोन्ही पदार्थ आपल्याला स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होतात. या दोन्ही पदार्थांनी बनवलेले पेय सहज तयार होते. जर तुम्हाला पोट दुखी ची समस्या त्रास देत असेल ,पोटामध्ये गॅस झाला असेल तर अशा वेळी या दोन्ही पदार्थांनी बनवलेले पेय आपल्याला प्यायला पाहिजे. हे पेय बनविण्यासाठी आपल्याला एका पातेला मध्ये एक ग्लासभर पाणी घेऊन त्यामध्ये एक चमचा ओवा व अर्धा चमचा काळे मीठ मिक्स करून हे मिश्रण उकळू द्यायचे आहे. हे मिश्रण थंड झाल्यावर आपल्याला प्यायचे आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/02/23025543/Health-acidity-04.jpg)
4 / 5
![जेवण झाल्यावर बडीशेप खाणे आपल्या शरीरासाठी लाभदायक मानले गेले आहे.बडिशोप मध्ये असे अनेक एंटीऑक्सीडेंट गुणधर्म असतात. जे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर काढतात. बडिशोप पासून बनवले गेलेले पेय आपण नेहमी प्यायलो तर आपल्या पोटासाठी चांगले ठरते. यासाठी आपल्याला एक ग्लासभर कोमट पाणी घ्यायचे आहे आणि त्यामध्ये बडीशेप पावडर मिक्स करून हे मिश्रण सेवन करायचे आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2022/02/23025548/Health-acidity-05.jpg)
5 / 5
![त्रिफळा चूर्ण कोणत्या वेळी पिणे उत्तम असते ? त्रिफळा चूर्ण कोणत्या वेळी पिणे उत्तम असते ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-ayurvedic-powder-for-health-1.jpg?w=670&ar=16:9)
त्रिफळा चूर्ण कोणत्या वेळी पिणे उत्तम असते ?
![सोललेले की विना सोललेले, कोणत्या बदामात आहे 'दम' सोललेले की विना सोललेले, कोणत्या बदामात आहे 'दम'](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Almonds.jpg?w=670&ar=16:9)
सोललेले की विना सोललेले, कोणत्या बदामात आहे 'दम'
![लसूण आणि कांदा एकत्र खाल्ल्याने काय होतं? जाणून घ्या लसूण आणि कांदा एकत्र खाल्ल्याने काय होतं? जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/Onion_Garlic-3.jpg?w=670&ar=16:9)
लसूण आणि कांदा एकत्र खाल्ल्याने काय होतं? जाणून घ्या
![कच्चं कोरफड खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात? कच्चं कोरफड खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-aloe-vera-10.jpg?w=670&ar=16:9)
कच्चं कोरफड खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतात?
![स्वप्नात या पक्षाचा पंख दिसला, तर समजून जा तुमचे दिवस पालटणार स्वप्नात या पक्षाचा पंख दिसला, तर समजून जा तुमचे दिवस पालटणार](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/women-5.jpg?w=670&ar=16:9)
स्वप्नात या पक्षाचा पंख दिसला, तर समजून जा तुमचे दिवस पालटणार
![या 3 वस्तू जेवणातून बाद; झटक्यात घटवले 38 किलो वजन, रुपडंच पालटलं या 3 वस्तू जेवणातून बाद; झटक्यात घटवले 38 किलो वजन, रुपडंच पालटलं](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-Sujata-Weight-Loss-3.jpg?w=670&ar=16:9)
या 3 वस्तू जेवणातून बाद; झटक्यात घटवले 38 किलो वजन, रुपडंच पालटलं