Health care | नेहमी अंडी खाताय?, अतिरेक झाल्यावर होऊ शकतो जीवघेणा गंभीर आजार!
अंडी (Egg) खाणे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक मानले जाते. परंतु जर आपण अंडी मर्यादेपेक्षा जास्त खाल्ल्यास आपल्याला भविष्यात गंभीर आजार देखील होऊ शकतात. त्यामुळं अंडी खाताना जरा विचार करून खाल्ले पाहिजे. संडे हो या मंडे रोज खावो अंडे असं करू नका.
आपल्यापैकी अनेकांनी एक घोषवाक्य ऐकले असेल ते म्हणजे ‘संडे हो या मंडे, रोज खाएं अंडे’, या स्लोगनचा सर्वसामान्य अर्थ असा आहे, की अंडी (Egg) खाणे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक असते. अंड्यामध्ये प्रोटीनची मात्रा भरपूर प्रमाणामध्ये असते. अंडी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील लोक मोठ्या आवडीने खात असतात. आपल्याकडे अंड्याद्वारे बनवलेल्या वेगवेगळ्या पदार्थांची रेसिपी सुद्धा मोठ्या आवडीने खाल्ली जाते. अंड्यामध्ये अनेक असे पोषक तत्व उपलब्ध असतात,जी आपल्या शरीराच्या जडण घडणीसाठी गुणकारी ठरतात म्हणूनच तुम्ही अनेकदा पाहिले असेल की ज्या व्यक्ती नियमितपणे एक्ससाइज करतात, ते आपल्या आहारामध्ये (Diet) जास्तीत जास्त अंड्याचा समावेश करत असतात. एक्सपर्ट सगळ्या हंगामामध्ये प्रत्येक दिवशी अंडी खाण्याचा सल्ला देत असतात. परंतु नुकतेच केले गेलेल्या संशोधनामध्ये एक गोष्ट सिद्ध झाली आहे की, दिवसाला एकापेक्षा जास्त अंडी खाल्ल्याने आपल्याला टाईप टू डायबिटीजचा (Type 2 Diabetes) धोका होऊ शकतो तसेच हा आजार होण्याचे प्रमाण 60 टक्के पेक्षा अधिक असते.
रिसर्चमध्ये केला गेला मोठा खुलासा
संशोधकांचे म्हणणे आहे की, चीनमधील स्वास्थ आणि पोषण सर्वेक्षणामध्ये 8000 पेक्षा जास्त लोकांनी सहभाग घेतला होता. या सर्वेक्षणात अनेक गोष्टी प्रामुख्याने समोर आल्या आहेत. ज्या व्यक्तींनी जास्त प्रमाणामध्ये अंडीचे सेवन केले होते, ते लोक शारीरिक रूपाने खूपच कमी सक्रिय होते. त्या व्यक्तींच्या शरीरामध्ये सिरम कोलेस्टरॉलची लेव्हल अधिक होती. त्यांनी हाय फॅट व ॲनिमल प्रोटीनचे सेवन जास्त प्रमाणात केले होते, असे विविध निष्कर्ष संशोधनाच्या अंती दिसून आले.
अंडी खाणार असाल तर आत्ताच व्हा सावधान!
केलेल्या रिसर्चनुसार अंड्यामध्ये जो पिवळा बलक असतो त्यामुळे कोलीन ऑक्सीकरण आणि सूज निर्माण होण्याची समस्या वाढते. जगभरातील अनेक घरांमध्ये सकाळी नाश्ता मध्ये अंड्यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. अंड्यामध्ये प्रोटीन भरपूर प्रमाणामध्ये असते आणि म्हणूनच अंड्याला प्रोटीन्स चा सोर्स देखील मानला जातो. अनेक तज्ज्ञ मंडळींच्या मते, आपण जर अंडी सेवनाचा अतिरेक केला म्हणजेच जास्त प्रमाणामध्ये अंडी खाल्ल्यास भविष्यात आपल्याला डायबिटीजचा धोका उद्भवू शकतो. एका अंड्यामध्ये अंदाजे 200 मिलीग्राम कोलेस्ट्रॉल असते. हे प्रमाण डायबिटीस रुग्णांना धोकादायक ठरू शकते.
हा आहे अंडी खाण्याचा उत्तम पर्याय
आपल्यापैकी अनेक जण अंडी वेगवेगळ्या पद्धतीने बनवून खात असतात परंतु जर तुम्ही अंडी उकळून त्यावर मीठ ,काळीमिरी आणि कोथिंबिरीची पेस्ट टाकून खाऊ शकता. जर तुम्ही दोन अंडी एकत्र करून वेजिटेबल आमलेट बनवून खाल्ला तर हा एक अंडे खाण्याचा उत्तम पर्याय ठरू शकतो.