सांगलीच्या सुपुत्राला अखेरचा निरोप, शहीद रोमित चव्हाण यांच्या अंत्यसंस्काराला जनसागर, कुटुंबावर दुःखाचा डोंगर

जम्मू काश्मीरमधील शोपियानमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. यामध्ये सांगलीतील शिगाव येथील रोमित चव्हाण शहीद झाले.

| Updated on: Feb 21, 2022 | 9:13 AM
सांगली जिल्ह्यातील शिगाव वाळवा तालुक्यातील शिंगावच्या सुपुत्राला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण आलं. 23 वर्षीय रोमित तानाजी चव्हाण (Romit Chavhan) जम्मू काश्मीर येथे देशसेवा बजावत असताना शहीद झाले.

1 / 10
जम्मू काश्मीर येथील शोपिया या भागामध्ये दहशतवादी आल्याची माहिती मिळाली होती. सर्च ऑपरेशन कारवाईच्या वेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी गोळीबार केला. त्यामध्ये सांगलीतील शिंगाव सुपुत्र, 1 राष्ट्रीय रायफलचे जवान रोमित तानाजी चव्हाण हे दहशतवाद्यांशी लढताना शहीद झाले.

2 / 10
सांगलीच्या सुपुत्राला अखेरचा निरोप देण्यासाठी जनसागर उसळला होता. शिंगावमध्ये रोमित चव्हाण यांच्या अंत्यदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गावकरी जमले होते.

3 / 10
रोमित चव्हाण यांचे फोटो असलेले बॅनर गावात ठिकठिकाणी छापण्यात आले होते. रोम्या भावा, तुझी नेहमी आठवण येईल, असे संदेश त्यांच्या मित्रांनी पोस्टरवर लिहिले आहेत.

4 / 10
शहीद रोमित चव्हाण यांचे पार्थिव काल (20 फेब्रुवारी) रात्री पुणे येथून इस्लामपूरला आणण्यात आले. त्यानंतर आज (21 फेब्रुवारी) सकाळी 6 वाजता त्यांच्या मूळगावी शिगाव येथील राहत्या घरी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सकाळी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

5 / 10
 पाच वर्षांपूर्वी रोमित मुंबई येथे सैन्य दलात भरती झाले होते. त्यानंतर मध्यप्रदेश येथील सागर येथे महार रेजिमेंटल सेंटरवर त्यांचे एक वर्ष ट्रेंनिग झाले होते. तिथून त्यांच्या देशसेवेला सुरुवात झाली होती.

6 / 10
 जम्मू काश्मीर येथील शोपिया भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती भारतीय सैन्याला समजली. त्यानंतर या भागात घेराबंदी करून सर्च ऑपरेशन करण्यात आले होते. यावेळी लपून बसलेल्या दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार सुरु केला. शिगाव येथील रोमित चव्हाण आणि उत्तर प्रदेश येथील संतोष यादव हे जवान शहीद झाले.

7 / 10
रोमितचे वडील तानाजी चव्हाण हे सांगलीतील राजारामबापू पाटील साखर कारखाना येथे कार्यरत आहेत. आई गृहिणी आहे तर धाकटी बहीण शिक्षण घेत आहे.

8 / 10
शिगाव गावासह पंचक्रोशीत ही बातमी पसरताच गावावर शोककळा पसरली आहे.. या घटनेमुळे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे

9 / 10
सकाळी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

10 / 10
Follow us
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.