आज आमलकी एकादशी फाल्गुन (Falgun) महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला अमलकी एकादशी (Amalaki Ekadashi 2022 ) म्हणतात . याला आवळा एकादशी असेही म्हणतात . या दिवशी भगवान विष्णूच्या पूजेसोबत आवळ्याच्या झाडाचीही पूजा केली जाते.
या एकादशीचे निमित्त साधत आळंदी मध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. विविध धार्मिक आणि सामाजिक दिनाचे औचित्य साधत देवस्थान च्या वतीने मंदिरात आकर्षक सजावट करण्यात येते.
यावेळी समाधीचे विलोभनीय दृश्य पाहून भाविकांचे मन अगदी मोहून गेले. यावेळी झेंडू सोबतच मखमलीच्या फुलांचा वापर करण्यात आला होता.
अमलकी एकादशीचा शुभ मुहूर्त हिंदू (Hindu)कॅलेंडरनुसार, एकादशीची तारीख 13 मार्च रोजी सकाळी 10.21 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 14 मार्च रोजी रात्री 12.05 पर्यंत असेल. उदय तिथीनुसार हे व्रत 14 मार्च रोजी ठेवण्यात येणार आहे. यावेळी अमलकी एकादशीला सर्वार्थ सिद्धी योगही तयार होत असून तो अधिक शुभ आणि फलदायी ठरेल.
यावेळी अमलकी एकादशीला सर्वार्थ सिद्धी योगही तयार होत असून तो अधिक शुभ आणि फलदायी ठरेल. सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 06.32 पासून सुरू होऊन रात्री 10.08 पर्यंत राहील. 15 मार्च रोजी सकाळी 06.31 ते 08.55 पर्यंत व्रत सोडण्याचा शुभ मुहूर्त आहे.