Photo : खासदार सुप्रिया सुळेंच्या पुढाकारातून 12 दिव्यांग जोडप्यांचा विवाह सोहळा
पुणे येथील मार्केट यार्ड परिसरातील एका मंगलकार्यलयात या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सर्व 12 जोडप्यांचा हळदी समारंभ व अन्य विधी संपल्यानंतर प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे सामूहिक पूजन करून सर्व नवदाम्पत्यांनी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन केले. या सोहळ्यादरम्यान कोविड विषयक नियमांचेही पालन करण्यात आले.
Most Read Stories