भाजप कार्यकर्त्यांनी रस्ता काबीज केला होता. काँग्रेसच्या मोदी माफी मांगो आंदोलनाचा उत्तर देण्यासाठी आधीच भाजप कार्यकर्ते एकवटले होते.
मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
आंदोलनाआधीच मोठ्या संख्येनं कार्यकर्ते जमले होते. यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
मनोज कोटक यांच्या कार्यालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांचं शक्तिप्रदर्शन केलंय. मोठ्या संख्येनं भाजपचे महिला आणि पुरुष कार्यकर्ते जमले होते. सरकारविरोधात घोषणाबाजी करत या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं आंदोलन सुरु होण्याआधीच आव्हान दिल्याचं यानिमित्तानं पाहायला मिळालं.
राम कदम आणि मनोज कोटक यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारविरोधात यावेळी भाजप कार्य़कर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली.
पोलिसांनी मुलूंडचा आरपी रोड कार्यकर्ते जमल्यामुळे बंद केला होता. एमजी रोडपासून भक्ती मार्गला जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता.
काँग्रेस विरुद्ध भाजप असा संघर्ष मुलुंडमध्ये पेटण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे.
भाजपचे खासदार मनोज कोटक यांच्या मुलुंड इथल्या सेवालय ऑफिसबाहेर कार्यकर्त्यांची एकच गर्दी सोमवारी सकाळी पाहायला मिळाली होती.