महागाईविरोधात सोलापूरमध्ये काँग्रेसचे आंदोलन, केंद्र सरकारच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी
महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आज पुन्हा एकदा व्यवसायिक गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 250 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. तर गेल्या आठवड्याभरात पेट्रल आणि डिझेलच्या किमती आठवेळा वाढल्या आहेत. वाढत्या महागाईविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरले असून, राज्यभरात काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे. आज सोलापूरमध्ये काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
Most Read Stories