जयंत पाटील यांचे सुपुत्र चिरंजीव राजवर्धन आणि मिहीर दोशी यांची कन्या रिया यांचा विवाह समारंभ आज मुंबई पार पडला. जयंत पाटील यांनी हा विवाह सोहळा कोरोनामुळे छोटेखानी पद्धतीनं करण्यात येत असल्याची माहिती फेसबुकवरुन दिली होती.
जितेंद्र आव्हाडांनी नवदाम्पत्याची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाचं आज मुंबईत लग्न छोटेखानी पद्धतीनं पार पडलं
नुकतंच गोव्यात मुलीचं रिसेप्शन करुन आलेले जितेंद्र आव्हाडही जयंत पाटलांच्या मुलाच्या लग्नाला आले होते.
छगन फुजबळ आणि कुटुंबीय जयंत पाटील यांच्या मुलाच्या लग्नासाठी आवर्जून उपस्थित होते. यावेळी त्यांनी नवदाम्पत्याची भेट घेऊन त्यांना शुभाशीर्वाद दिले.
अतुल भातखळकर यांनी जयंत पाटील यांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावली. यावेळी त्यांनी नवविवाहीत दाम्पत्याला भरभरुन शुभेच्छा दिल्यात.
हर्षवर्धन पाटलीही जयंत पाटील यांच्या लग्नसोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
राष्ट्रवादी नेते नवाब मलिक यांनीही जयंत पाटील यांच्या मुलाच्या लग्नाला हजेरी लावली होती.