Prabodhankar Thackeray Death Anniversary | महाराष्ट्राचे ‘प्रबोधन’ करणारे प्रबोधनकार, जाणून घ्या त्यांच्या बद्द्लच्या खास गोष्टी

केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे. विचारवंत, नेते, लेखक, पत्रकार, संपादक, प्रकाशक, वक्ते, धर्मसुधारक, समाजसुधारक, इतिहाससंशोधक, नाटककार, सिनेमा पटकथा संवाद लेखक, अभिनेते, संगीततज्ज्ञ, शिक्षक, भाषाविद, लघुउद्योजक, फोटोग्राफर, टायपिस्ट, चित्रकार अशी सगळी विशेषणं लावूनही त्यांची ओळख आपण एका शब्दात सांगू शकत नाही.

| Updated on: Nov 20, 2021 | 3:12 PM
सत्यशोधक आंदोलनातले एक धडाडीचे समाजसुधारक आणि प्रभावी लेखक पत्रकार म्हणून सर्वश्रूत असणारे लेखक म्हणजे केशव सीताराम ठाकरे म्हणजेच प्रबोधनकार ठाकरे. विचारवंत, नेते, लेखक, पत्रकार, संपादक, प्रकाशक, वक्ते, धर्मसुधारक, समाजसुधारक, इतिहाससंशोधक, नाटककार, सिनेमा पटकथा संवाद लेखक, अभिनेते, संगीततज्ज्ञ,  शिक्षक, भाषाविद, लघुउद्योजक, फोटोग्राफर, टायपिस्ट, चित्रकार अशी सगळी विशेषणं लावूनही त्यांची ओळख आपण एका शब्दात सांगू शकत नाही.

1 / 7
प्रबोधनकारांचा जन्म  १७ सप्टेंबर १८८५ रोजी रायगडमधील पाली येथे झाला. अष्टविनायकमधील पालीचा गणपती त्यांचे कूलदैवत असल्याचा उल्लेख काही कागदपत्रात मिळतो. त्यांच्या  जडणघडणीत वडिलांपेक्षाही आईचा प्रभाव मोलाचा होता. त्यांच्या आईने त्यांना स्वाभिमानाचे संस्कार दिले. एकदा त्यांच्या वडिलांना ल़ॉटरी लागली होती तेव्हा  लॉटरी ७५ रुपयांची होती. पण हे पैसे परक्याचे आहेत आपल्याला कष्टाचीच भाकरी हवी, अशी त्यांच्या आईची शिकवण होती. त्यांच्या आईमुळेच त्यांना वाचनाची सवय लावली आणि त्यानंतर महाराष्ट्राला एक हरहून्नरी लेखक पत्रकार मिळाला.

2 / 7
 समोर दिसणाऱ्या अन्याया विरुद्ध पेटून उठणे. बंडखोर स्वभावाचा वटवृक्षासारखा बहरणारा हा माणूस जणू शंभर माणसांच आयुष्य जगला. चाकोरीत विचार करणं  त्यांना मान्यच नव्हत. एका चौकटीत राहून त्यांनी काम केलं नाही . वडिलांची नोकरी सुटल्यामुळे आणि पनवेलमध्येपुढचं शिक्षण नसल्यामुळे त्यांच शिक्षण थांबलं. त्यामुळे कधी बारामती तर कधी मध्य भारतातलं देवास अशी धावाधाव झाली.  तेव्हापासून साईनबोर्ड रंगवणं, रबरी स्टॅम्प बनवणं, बुकबायडिंग, भिंती रंगवणं, फोटोग्राफी, मशीन मेकॅनिक असे  व्यवसाय त्यांनी केले. हुन्नर असेल तर बेकारी कशाला, हे जगण्याचं ध्येयच होतं.

3 / 7
सार्वजनिक नवरात्रौत्सवाचे प्रणेते प्रबोधनकारांनीसार्वजनिक नवरात्रोत्सवाची सुरुवात केली. गुजराती गरबे आणि बंगाली दुर्गापूजा हे आधीपासून असतीलही पण मूर्ती आणून देवीची महाराष्ट्रीय पद्धतीची  नवरात्री सुरू करण्याचं श्रेय प्रबोधनकारांचेच होते.

4 / 7
साहित्य :  ‘वक्तृत्वशास्त्र’ (१११९) हे प्रबोधनकारांचं पहिलं महत्त्वाचं पुस्तक मानायला हवं.  खुद्द लोकमान्य टिळकांनी याचं कौतूक केलं होतं. पण त्याआधीही त्यांनी ‘लाईफ अँड मिशन ऑफ रामदास ’ (१९१८) हे संत रामदासांचं इंग्रजी चरित्र लिहिल्याचा उल्लेख आहे. पण ते पुस्तक आज उपलब्ध नाही.‘माझी जीवनगाथा ’ हे त्यांचं आठवणीपर आत्मचरित्र आज विसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या इतिहासाच्या अभ्यासासाठी एक महत्त्वाचा दस्तऐवज बनलाय.

5 / 7
 संयुक्त महाराष्ट्र:  संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, भाई माधवराव बागल, ‘प्रभात’कार वा. रा. कोठारी आणि सेनापती बापट प्रमुख नेत्यांमध्ये होते. मुंबई खऱ्या अर्थाने त्यांच्या प्रयत्नानेच महाराष्ट्राला मिळाली.

6 / 7
२० नोव्हेंबर १९७३ रोजी प्रबोधनकारांचं निधन झालं. आणि एक ज्वलंतशिल लेखणीला पुर्णविराम लागला. त्यांची अंत्ययात्रा ही बाबासाहेब आंबेडकरांनंतरची मुंबईतली सर्वात मोठी अंत्ययात्रा मानली गेली.

7 / 7
Follow us
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.