जर तुम्हाला 5 ते 6 हजारांमध्ये एखादा धमाकेदार फोन खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी एक खास ऑफर आहे. सॅमसंगने (Samsung) आपल्यासाठी एक उत्तम संधी आणली आहे. सॅमसंगच्या एंट्री लेव्हल फोन गॅलेक्सी M01 कोअर (Galaxy M01 Core) ची किंमत कमी करण्यात आली आहे. हा फोन गेल्या वर्षी भारतात लॉन्च करण्यात आला होता.
Samsung Galaxy M01 Core चा 1 जीबी रॅम + 16 जीबी स्टोरेज वेरिंएंट फोन तुम्ही फक्त 4,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. आधी याची किंमत 5,499 रुपये होती. तर आता 2 जीबी रॅम + 32 जीबी स्टोरेज वेरिएंटला 5,999 रुपयांमध्ये खरेदी करता येणार आहे. या मॉडेलला मागच्या वर्षात 6,499 रुपयांमध्ये लॉन्च करण्यात आलं होतं.
Samsung Galaxy M01 Core हा फोन पहिल्यांदा यूजर्सच्या आवडीने तयार करण्यात आला आहे. Samsung Galaxy M01 Core मध्ये 5.3 इंचचा HD+ डिस्प्ले आहे. हा फोन ब्लॅक, ब्लू आणि रेड कलरमध्ये मिळेल. सोबतच यामध्ये 4G सपोर्टही देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेकचा क्वॉडकोर 6739 प्रोसेसर लावण्यात आला आहे.
या फोनमध्ये स्मार्ट पेस्ट, सजेस्ट नोटिफिकेशन, डार्क मोडसह अनेक नवीन वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. स्मार्ट पेस्टच्या मदतीने कोणतीही गोष्ट कॉपी-पेस्ट करणे सोपे होईल, तर सजेस्ट नोटिफिकेशन वापरकर्त्यास अॅप बंद करण्याची आणि बॅटरी कमी असताना पॉवर सेव्हिंग मोडवर जाण्यास मदत करेल.
Samsung Galaxy M01 Core मध्ये 8 मेगापिक्सलचा रियर कॅमरा देण्यात आला आहे. ज्यामध्ये फ्लॅश लाईटही आहे. या फोनमध्ये सेल्फीसाठी 5 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला असून 3000mAh ची बॅटरी आहे ज्याला कंपनीने 11 तासांच्या बॅटरी बॅकअपचा दावा केला आहे.