Sankranti 2022: ‘चेहरे का नूर ही कुछ अलग सा लगता है’, संक्रांतीनिमित्त स्पृहाचे खास फोटो!
आज नवीन वर्षातील पहिला सण म्हणजेच संक्रांत आहे. त्यानिमित्त अभिनेत्री स्पृहा जोशीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
आज नवीन वर्षातील पहिला सण म्हणजेच संक्रांत आहे. त्यानिमित्त अभिनेत्री स्पृहा जोशीने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नेसली जाते. स्पृहानेही परंपरेला साजेशी काळ्या रंगाची साडी नेसली आहे आणि फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Follow us
स्पृहाने काळ्या रंगाच्या साडीला साजेशी ज्वेलरीही परिधान केली आहे. सिलव्हर रंगाच्या बांगड्या आणि त्याला साजेसा हार तिने घातला आहे. आणि प्लेन ब्लॅक साडीला सूट होणारा अबोली रंगाचा ब्लाऊज तिच्या सौंदर्यात भर घालतोय.
आज स्पृहाचा ‘कॉफी’ हा सिनेमा प्रदर्शित झालाय. या सिनेमाला कसा प्रतिसाद मिळतो हे पाहावं लागेल. या आधीही स्पृहाने उत्तमोत्तम सिनेमे दिले आहेत. लॉस्ट अॅण्ड फाउंड, होम स्वीट होम, अ पेईंग घोस्ट, देवा आणि मला काहीच प्रॉब्लेम नाही ही काही तिच्या निवडक सिनेमांची नावं आहेत. तिच्या अभिनय कौशल्यामुळे प्रेक्षक तिच्यावर भरभरून प्रेम करतात. सिनेमांसोबतच तिच्या अर्थपूर्ण कविताही वाचकांना आपल्याश्या वाटतात.
स्पृहा सोशल मीडियावरही अॅक्टिव्ह असते. वेगवेगळ्या पोस्टच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहते. तिचे फोटो आणि कविता चाहत्यांच्या पसंतीस उतरतात.
फक्त पारंपरिकच नाही तर वेस्टर्न लूकही स्पृहा तितक्याच चांगल्या प्रकारे कॅरी करते. याआधी तिने वेस्टर्न लूकमधले काही फोटो इन्साग्रामवर शेअर केले आहेत.