Happy Birthday Virat Kohli | मुंबईत 34 कोटींचं घर, Audi ते Land Rover गाड्यांचा ताफा, विराट कोहलीचं वार्षिक उत्पन्न किती?
भारतीय कर्णधार विराट कोहलीची गणना जगातील क्रिकेटच्या सर्वात मोठ्या धावपटूंमध्ये होते. त्याशिवाय तो क्रीडा जगतातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्येही मोडला जातो. त्याच्या कमाईचे प्रमाण कोणत्याही क्रिकेटपुरते मर्यादित नाहीये. त्याने क्रिकेट जगतातील सीमारेषा ओलांडून व्यावसायिक क्षेत्रातही आफले पाय पसरले आहेत. विराट कोहली हा क्रिकेट जगतातील श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखला जातो.
Virat Kohli
Follow us
भारतीय कर्णधार विराट कोहलीची गणना जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेटर्समध्ये होते. त्याशिवाय तो क्रीडा जगतातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्येही मोडला जातो. त्याच्या कमाईचे प्रमाण कोणत्याही क्रिकेटपुरते मर्यादित नाहीये.
त्याने क्रिकेट जगतातील सीमारेषा ओलांडून व्यावसायिक क्षेत्रातही आफले पाय पसरले आहेत. विराट कोहली हा क्रिकेट जगतातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असल्याचं मानलं जातं.
रिपोर्ट्सनुसार, कोहलीची वार्षिक कमाई जवळपास 130 कोटी रुपये आहे. तर सध्या त्याच एकूण संपत्ती 900 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. भारतीय कर्णधाराची बहुतेक कमाई ही ब्रँड एंडोर्समेंट्स, जाहिराती आणि स्टार्टअप्समधून होते.
विराट कोहली हा बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रेक्टमध्ये A+ श्रेणीचा खेळाडू आहे. त्याच्याशिवाय, रोहित आणि बुमराहनेही या ग्रेडमध्ये स्थान मिळवले आहे. या श्रेणीतील खेळाडूंची वार्षिक कमाई 7 कोटी रुपये आहे.
विराटची कमाई वेगवेगळ्या फॉरमॅटच्या प्रत्येक सामन्यातून मिळवलेल्या मोठ्या रकमेतून, कामगिरीच्या आधारावर करतो. जे लाखांमध्ये असते. दुसरीकडे, आयपीएलमध्ये विराट कोहलीला आरसीबीकडून दरवर्षी 17 कोटी रुपये मिळतात.
विराट कोहलीच्या कमाईचा स्रोत फक्त क्रिकेटच नाही तर जाहिराती देखील आहे. असे अनेक ब्रँड्स आहेत ज्यांच्या माध्यमातून विराट मोठी कमाई करतो. यामध्ये Wrogn, One8, Puma, Audi, MRF, Colgate-Pammolive आणि Tissot सारख्या मोठ्या ब्रँडचा समावेश आहे. एका अहवालानुसार, ब्रँड एंडोर्समेंटमधून त्याची वार्षिक कमाई 178.77 कोटी रुपये आहे.
कोहलीला बंगले आणि वाहनांचा देखील शौक आहे. त्याचे मुंबईतील वरळी येथे एक आलिशान अपार्टमेंटमध्ये आहे, ज्याची एकूण किंमत 34 कोटी रुपये आहे. त्याच्याकडे वाहनांचीही मोठी रांग पाहायला मिळते. ज्यात R8 V10 Plus, R8LMX, Audi RS5, Audi Q8, Land Rover Vogue, Bentley Flying Spur, Bentley Continental GT या मॉडेल्सचा समावेश आहे.