लग्नानंतरचा पहिला सण तर नवीन घरातला पहिला सण.. मराठी कलाकारांची मकरसंक्रांतीची तयारी

मकर संक्रांती हा या वर्षातील पहिला सण आहे. मराठी कलाकारसुद्धा अत्यंत जल्लोषात हा सण साजरा करणार आहेत. विविध मालिकांमधील या अभिनेत्री कशा पद्धतीने हा सण साजरा करणार आहेत, याविषयी त्यांनी सांगितलं आहे. काहींसाठी हा लग्नानंतरचा पहिला तर काहींसाठी हा नव्या घरातील पहिला सण आहे.

| Updated on: Jan 11, 2024 | 3:28 PM
वर्षाचा पहिला सण 'मकरसंक्रांत' जवळ आला आहे. तिळगुळाचा खमंग सुगंध हवेत पसरला आहे, बाजारात विविध रंगांचे पतंग, सजावटीच्या वस्तू आणि  हलव्याचे दागिने  पाहायला मिळतायत. सण म्हटलं की त्याच्या आठवणी आणि त्याला साजरा करण्याचा उत्साह सगळ्यांमध्ये असतो आणि कलाकार काही वेगळे नाही. झी मराठीच्या कलाकारांनी मकरसंक्रांत निमित्ताने त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

1 / 6
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मध्ये विरोचकाची भूमिका साकारणाऱ्या सुरुची अडारकरची लग्नानंतरची ही पहिली मकरसंक्रांत आहे. सुरुचीने आपला आनंद व्यक्त करताना सांगितलं, "माझ्यासाठी खूप खास दिवस आहे. कारण लग्नानंतरचा माझा हा पहिला सण आहे. पण मी आणि पियुष आम्ही दोघेही शूटिंग मध्ये व्यस्त आहोत. मला आठवतंय की मी माहेरी होती तेव्हा हळदी-कुंकू समारंभाची एक वेगळीच मज्जा असायची. आमच्याकडे लग्नानंतर पहिला सण साजरा नाही करत. पण तिळगुळ खाणं आणि इतर गोष्टीचा आम्ही नक्की आनंद घेणार आहोत."

2 / 6
'सारं काही तिच्यासाठी' मालिकेतील उमा म्हणजेच  खुशबू तावडेनं सांगितलं, "आमच्यासाठी ही मकरसंक्रांत खूप खास आहे. कारण नवीन घरातील आणि या नव्या वर्षाचाही पहिला सण आहे. नवीन घरात मार्गशीर्षातल्या गुरुवारी स्थलांतर केलं. हंगाम बदलतो त्यासोबत खाण्या-पिण्याच्या सवयीही बदलतात. तीळ आणि गुळाचा खाण्यात समावेश होतो. या काळात मी काळे कपडे परिधान करते. कारण त्याने उब मिळते. हळदी-कुंकू माझ्या सासरी म्हणजे सायनला होतं. एकदम पारंपरिक पद्धतीने मकरसंक्रांत साजरी केली जाते. माझा मुलगा राघव थोडं बोलायला लागला आहे. तर त्याच्या तोंडातून तिळगुळ घ्या गोड गोड बोला हे ऐकण्याचं कुतहूल मला आहे."

3 / 6
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’मधली नेत्रा म्हणजेच अभिनेत्री तितिक्षा तावडे म्हणते, "मकरसंक्रांत मी कुटुंबासोबत साजरी करते. माझी लहानपणाची आठवण आहे जेव्हा मी, खुशबू, आई आणि बाबा आम्ही एकत्र बसून तिळगुळाचे लाडू बनवायचो. मला लक्षात आहे मला ते नीट बनवायला जमायचे नाही आणि सारण गरम असल्यामुळे ते लाडू माझ्या हातात फुटायचे. गेले काही वर्षापासून  मी उत्तम तीळ गुळाचे लाडू बनवते. आई- बाबा दुकान बंद करून उशिरा रात्री परतयायचे पण एकत्र बसून लाडू बनवायचा कार्यक्रम दरवर्षीचा ठरलेला होता. मला तिळगुळाचे लाडू प्रचंड आवडतात मी एका खेपेत डब्बा भरून लाडू संपवायचे. या वर्षी सुद्धा आई-बाबां सोबत सण साजरा करायचा हाच बेत आहे."

4 / 6
'सारं काही तिच्यासाठीची' मालिकेतील निशी म्हणजेच दक्षता जोईल म्हणते,  "मला लहानपणी आई- बाबानी संक्रांतीचं महत्व समजावलं होत आणि तेव्हा पासून मला ह्या  सणाची उत्सुकता होती. तर मला सर्वांना हा सण साजरा करण्यामागचं कारण सांगायला खूप आवडेल. मकरसंक्रांतला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. माझी मकरसंक्रांतची आठवण सांगायची झाली तर हळदी कुंकूला मिळणारे घरचे नरम तीळगुळाचे लाडू आणि वाण जे आईला मिळतात, आणि ते मिळालेलं वाण जर माझ्या उपयोगाचं असेल तर ते माझे  होऊन जातं. ह्या वर्षीही मी वाट पाहत आहे हळदी कुंकूंचे आणि तिळगुळांचे.”

5 / 6
‘अप्पी आमची कलेक्टर’ मधली अप्पी म्हणजे शिवानी नाईक म्हणते, " मकरसंक्रातीच्या खूप साऱ्या आठवणी आहेत. मागचे २-३ वर्ष मी अहमदनगर मध्ये मी संक्रांत साजरी करत होते, कारण अहमदनगर महाकरंडक स्पर्धेचा शेवटचा दिवस असायचा हा. वर्षाचा पहिला सण आणि तो ही नाटकाच्या ग्रुप सोबत साजरा करण्याचा उत्साह वेगळाच असतो. एका कलाकारालासाठी ह्याऊन आनंदाची गोष्ट काय असू शकते. पण जेव्हा मी घरी असते तेव्हा आम्ही  पतंग उडवतो  सर्व एकत्र मिळून, गोडाचं खातो जे ह्या हंगामात आपल्या शरीराला उष्णता देतात जसं तिळाचे आणि गुळाचे पदार्थ त्या सोबत सगळ्यांशी गाठीभेटी होतात. पण ह्या वर्षी हा सण 'अप्पी आमची कलेक्टरच्या' सेट वर शूटिंग करत साजरा केला जाणार आहे."

6 / 6
Follow us
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.