जगजाहीर नशा केली, न्यूड फोटो शूट केले, वादात अडकली, आता शेतकऱ्यांसाठी मैदानात, कोण आहे रिहाना?
रिहानाचं पूर्ण नाव रोबीन रिहाना फेंटी आहे. तिचा जन्म 20 फेब्रुवारी 1988 ला झाला होता.
Follow us
मागच्या दोन महिन्यांपासून देशाच्या राजधानीत शेतकरी आंदोलन सुरू आहे. दिल्लीमध्ये वेगवेगळ्या बॉर्डर्सवर कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन केलं आहे. या सगळ्यात जगप्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने शेताकरी आंदोलनावरून एक ट्विट केलं आहे.
या ट्विटमध्ये रिहानाने सीएनएनच्या एका बातमीचं ट्विट करत शेतकरी आंदोलनावरून ‘आपण याविषयी का विचार करत नाही’ असं तिने लिहलं आहे. या ट्वीटनंतर रिहाना सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आहे.
रिहानाचं पूर्ण नाव रोबीन रिहाना फेंटी आहे. तिचा जन्म 20 फेब्रुवारी 1988 ला झाला होता. ती एक बारबेडिअन पॉपस्टार, मॉडल आणि प्रसिद्ध व्यावसायिकसुद्धा आहे.
बारबाडोसमध्ये जन्मलेल्या, रिहानाला वयाच्या 16 व्या वर्षी रेकॉर्डिंग करिअरसाठी रेकॉर्ड निर्माता इव्हान रॉजर्सने अमेरिकेत बोलावलं होतं. 2005 मध्ये, रिहानाने तिचा पहिला स्टुडिओ अल्बम, म्युझिक ऑफ द सन प्रसिद्ध केला होता. जो बिलबोर्ड 200 चार्टच्या पहिल्या दहामध्ये पोहोचला.
एका वर्षापेक्षाही कमी वेळात रिहानाने तिचा दुसरा स्टुडिओ अल्बम, ए गर्ल लाइक मी (2006) प्रसिद्ध केला. तिच्या या अल्बम्सला नागरिकांनी प्रचंड पसंती दिली. हा बिलबोर्ड अल्बमवरील चार्टच्या पहिल्या पाचमध्ये पोहोचला होता.
या आंतरराष्ट्रीय पॉपस्टारच्या चाहत्यांची भारतातही कमी नाही. जगातील सर्वात श्रीमंत महिला संगीतकारात 32 वर्षीय रिहानाचं नाव आहे.
बारबडोजमध्ये जन्मलेल्या आणि अमेरिकेत पॉपस्टार म्हणून नाव कमावणाऱ्या रिहाना नेहमीच डेमोक्रॅट्सवर प्रभावी असते. ट्रम्प सरकारने इमिग्रेशन संदर्भात घेतलेल्या निर्णयावरही रिहानाने टीका केली होती.
यावेळीही तिने एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत त्यामध्ये ट्रम्प यांना टॅग केलं होतं. तर रिहानाने अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांना पाठिंबा दर्शविला होता. एकंदरीतच काय तर सामाजिक विषयांवर रिहाना नेहमीच प्रतिक्रिया देते.
गेल्या काही दिवसांआधीच तिने म्यानमारच्या विषयावर ट्विटही केलं होतं. यामध्ये माझ्या प्रार्थना म्यानमारसोबत असल्याचं तिने म्हटलं होतं.
मिळालेल्या माहितीनुसार, रिहाना ही तब्बल 600 मिलिअन डॉलर्सच्या संपत्तीची मालकीन आहे. इतकंच नाही तर तिची एकूण संपत्ती बहुतेक तिच्या फॅशन ब्रँडची आहे.