रण तामिळनाडूचे! बिगूल वाजला; पण सत्ता कुणाला मिळणार?; वाचा स्पेशल रिपोर्ट

तामिळनाडूतील राजकारणात एक हाती सत्ता आणणारा किंवा जनतेचं मोठं वलंय असलेला एक तरी नेता सध्या नाही, त्यामुळे तामिळनाडूत काय होईल यावर भाष्य करणं कठिण आहे. (2021 assembly election: know about tamil nadu politics)

रण तामिळनाडूचे! बिगूल वाजला; पण सत्ता कुणाला मिळणार?; वाचा स्पेशल रिपोर्ट
अमित शहा
Follow us
| Updated on: Mar 25, 2021 | 4:56 PM

चेन्नई: माजी मुख्यमंत्री जयललिता आणि करुणानिधी यांची उणीव, सुपरस्टार रजनीकात यांची राजकारणातील माघार, अभिनेते कमल हसन आणि  शशिकला यांची राजकारणातील एन्ट्री तसेच भाजपची एआयएडीएमके सोबत झालेली युती या पार्श्वभूमीवर तामिळनाडूची निवडणूक अत्यंत रंगदार होणार आहे. तामिळनाडूतील राजकारणात एक हाती सत्ता आणणारा किंवा जनतेचं मोठं वलंय असलेला एक तरी नेता सध्या नाही, त्यामुळे तामिळनाडूत काय होईल यावर भाष्य करणं कठिण आहे. या पार्श्वभूमीवर तामिळनाडूच्या राजकारणावर टाकलेला हा प्रकाश… (2021 assembly election: know about tamil nadu politics)

तामिळनाडूत एकाच टप्प्यात मतदान

तामिळनाडूत 234  जागांसाठी एक टप्प्यात मतदान होणार आहे. तामिळनाडूत 6 एप्रिल रोजी मतदान होणार असून 2 मे रोजी निकाल लागणार आहेत.

तामिळनाडूत कुणाकडे किती जागा

तामिळनाडू विधानसभेत एकूण 234 जागा आहेत. राज्यात एआयडीएमकेची सत्ता आहे. पलानीस्वामी हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत. गेल्या निवडणुकीत एमआयएडीएमकेच्या आघाडीने 134 जागा जिंकल्या होत्या. त्यावेळी डीएमके दुसऱ्या क्रमांकावर गेली होती. डीएमकेला 98 जागा मिळाल्या होत्या. डीएमकेसोबत काँग्रेस आणि छोटे राजकीय पक्ष होते. तर पीएमकेला एका जागावर विजय मिळाला होता. तामिळनाडूत सत्ता बनविण्यासाठी 118चा जादूई आकडा गाठावा लागतो. तामिळनाडूत भाजपचं अस्तित्व नाही. परंतु, भाजपने एआयएडीएमकेसोबत युती करून राज्यात चंचूप्रवेश करण्याची तयारी सुरू केली आहे.

शशिकला काय निर्णय घेणार?

व्ही.के. शशिकला यांनी माजी मुख्यमंत्री जयललिता यांची सावली समजलं जायचं. शशिकला या अभिनेत्री नाहीत आणि नेत्याही नाहीत. मात्र, जयललिता असताना राजकारणात त्यांचा शब्द प्रमाण मानला जायचा. त्यामुळे तामिळनाडूच्या राजकारणात त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. 27 जानेवारी रोजी शशिकला या चार वर्षांची शिक्षा भोगून तुरुंगातून आल्या आहेत. त्यांच्यावर ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती जमवल्याचा आरोप होता. अजून त्या त्यांच्या चेन्नई येथील घरी पोहोचलेल्या नाहीत. सध्या त्या बेंगळुरूच्या एका रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. रुग्णालयातून आल्यावर शशिकला या एआयएडीएमकेमध्ये सामिल होणार की स्वत:चा एएमएमके पक्ष निवडणुकीच्या मैदानात उतरवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. शशिकला यांच्या पक्षाला 2019च्या लोकसभा निवडणुकीत एकही सीट मिळाली नाही. पण त्यांच्या पक्षाला 8.46 टक्के आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकीत 10.39 टक्के मिळाली होती. त्यामुळे शशिकला यांना मानणारा मोठा वर्ग तामिळनाडूत असल्याचं सिद्ध झालं आहे.

लोकसभेची पुनरावृत्ती होणार

करुनानिधी यांच्या निधनानंतर डीएमकेची सर्व धुरा स्टालिन यांच्याकडे आली आहे. स्टालिन हे आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी 2019च्या निवडणुकीत आक्रमक प्रचार करत 39 पैकी 37 जागांवर उमेदवार निवडून आणले आहेत. तर सत्ताधारी एआयएडीएमकेला केवळ एकच खासदार निवडून आणता आला आहे. या उलट 2014च्या लोकसभा निवडणुकीत एआयएडीएमकेने 37 जागा जिंकल्या होत्या. तर भाजप आणि पीएमकेला प्रत्येकी एक जागा जिंकता आली होती. मात्र 2019च्या निवडणुकीत स्टालिन यांनी संपूर्ण चित्रं बदललं होतं. त्यामुळे स्टालिन विधानसभा निवडणुकीतही हीच कामगिरी करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

कमल हसन फॅक्टर

अभिनेते कमल हसन यांनी 2018मध्ये तामिळनाडूच्या राजकारणात अधिकृतपणे एन्ट्री केली. त्यांनी ‘मक्कल नीधि मय्यम’ (MNM) नावाचा पक्ष स्थापन केला. मात्र त्यांनी अद्याप निवडणुका लढवलेल्या नाहीत. मात्र, कमल हसन हे डाव्या विचारांचे आहेत. त्यांनी थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना तामिळनाडूत किती यश मिळतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. दुसरीकडे सुपरस्टार रजनीकांत यांनी आजाराचं कारण दाखवून राजकारणातून माघार घेतली. रजनीकांत यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यामुळे रजनीकांत यांनी तामिळनाडूचं राजकारण बदललं असतं. परंतु, त्यांनी माघार घेतल्याने त्याचा फायदा कमल हसन यांना होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, ऐन निवडणुकीत रजनीकांत कमल हसन यांच्या पाठी उभे राहतात की भाजपच्या? यावर तामिळनाडूतील बरीच गणितं अवलंबून आहेत.

विजयकांत यांचा चमत्कार

या शिवाय अभिनेते, निर्माते विजयकांत यांच्यापक्षाकडेही डोळेझाक करून चालणार नाही. विजयकांत यांनी देसीय मुरपोक्कू द्रविड कळघम (डीएमडीके) नावाचा पक्ष स्थापन केला आहे. 2011मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने 29 जागा जिंकल्या आहेत. सध्या ते त्यांच्या पक्षाचे महासचिव आणि आमदार आहेत. त्यामुळे येणाऱ्या निडणुकीत ते काय करिश्मा करतात यावरही बरंच अवलंबून असणार आहे.

भाजपला आशा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एआयएडीएमकेसोबत युती करण्यात भाजप यशस्वी झाली आहे. त्यामुळे भाजपने आता तामिळनाडूत जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यावर भर दिला आहे. तामिळनाडूत आपण सत्तेत येणार नाही हे भाजपलाही माहीत आहे. परंतु दोन अंकी आकडा गाठण्यावर भाजपचा भर असणार आहे. सत्ताधारी पक्षासोबत राहून सत्तेत आल्यास त्याचा भाजपला मोठा फायदा होऊ शकतो. त्यामुळे आता भाजपला किती जागा मिळणार आणि त्यावर भाजप काय प्लानिंग करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, अभिनत्री खुशबू सुंदर वगळता भाजपकडे अद्यापही तामिळनाडूत बडा नेता नसल्याने भाजपची अडचण झाली आहे. (2021 assembly election: know about tamil nadu politics)

हिंदी विरुद्ध तमिळ

तामिळनाडूच्या निवडणुकीत हिंदी विरुद्ध तमिळ हा मुद्दाही गाजू शकतो. हिंदीमध्ये शिक्षण देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारने आला होता. त्याला सर्वात मोठा विरोध तामिळनाडूतून झाला होता. सरकारच्या या निर्णयाला तामिळनाडूचे राजकारणी आणि अभिनेत्यांनीही विरोध केला होता. त्यामुळे विरोधकांकडून हिंदीचा मुद्दा उचलून भाजप आणि सत्ताधारी एआयएडीएमकेची कोंडी करण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचा फायदा स्टालिन यांच्या नेतृत्वाखालील डीएमकेलाच फायदा होऊ शकतो, असं राजकीय जाणकार सांगतात. (2021 assembly election: know about tamil nadu politics)

संबंधित बातम्या:

पाच राज्यांत आजपासून प्रचाराचं ‘तांडव’; पश्चिम बंगाल, आसाममध्ये 27 मार्चला, तर केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरीत 6 एप्रिल रोजी मतदान, 2 मे रोजी निकाल!

मराठी राजभाषा दिनाला राज ठाकरेंचं महाराष्ट्राला विनम्र आवाहन, वाचा त्यांचं पत्र जसंच्या तसं

संजय राठोडांचा राजीनामा घेत नाही, तोपर्यंत अधिवेशन चालू देणार नाही, भाजप आक्रमक

बिहारच्या या गावात अरबपती बिल गेट्सची मुलगी राहते, गरिबीमुळे शाळेत जाणंही कठीण

(2021 assembly election: know about tamil nadu politics)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.