Maharashtra Government : शिंदे सरकारमधील 20 पैकी 15 मंत्र्यांविरोधात केसेस, 40 टक्के मंत्री इयत्ता 12वीच्या आतले

Maharashtra Government : एडीआरच्या रिपोर्टनुसार, मंगलप्रभात लोढा यांची संपत्ती सर्वाधिक आहे. त्यांच्याकडे 441.65 कोटीची संपत्ती आहे. तर सर्वात कमी संपत्ती पैठणमधून विजयी झालेले संदीपान भुमरे यांच्याकडे आहेत. त्यांच्याकडे केवळ 2.92 कोटी रुपयाची संपत्ती आहे.

Maharashtra Government : शिंदे सरकारमधील 20 पैकी 15 मंत्र्यांविरोधात केसेस, 40 टक्के मंत्री इयत्ता 12वीच्या आतले
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 12, 2022 | 1:47 PM

मुंबई: राज्यात शिंदे-फडणवीस यांचं सरकार (Maharashtra Government) आल्यानंतर अखेर 39 दिवसानंतर राज्याचं मंत्रिमंडळ विस्तार (cabinet expansion) झाला आहे. या विस्तारात शिंदे गटाकडून 9 आणि भाजपकडून (bjp) 9 अशा 18 आमदारांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे. त्यामुळे शिंदे सरकारमधील मंत्र्यांची संख्या आता 20 वर पोहोचली आहे. मात्र, शिंदे सरकारमधील 20 पैकी 15 मंत्र्यांवर गुन्हेगारी स्वरुपाचे खटले सुरू आहेत. तर 40 टक्के म्हणजे 8 मंत्री केवळ इयत्ता 10 वी ते 12 पर्यंतच शिकलेले आहेत. त्यामुळे शिंदे यांना या मंत्र्यांना घेऊन राज्याचा कारभार हाकावा लागणार आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर)च्या अहवालात ही माहिती दिली आहे. राज्यातील 75 टक्के मंत्र्यांच्या विरोधात गुन्हेगारी स्वरुपाचे खटले सुरू आहेत. या मंत्र्यांनीच ही माहिती आपल्या निवडणूक शपथपत्रात दिली आहे.

एकनाथ शिंदे यांनी 30 जून रोजी मुख्यमंत्रीपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर 39 दिवसानंतर 18 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पकडून राज्यातील मंत्र्यांची संख्या 20 झाली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स आणि महाराष्ट्र इलेक्शन वॉचने 2019च्या विधानसभा निवडणुकीत मंत्र्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास करून त्यातून हे निष्कर्ष काढले आहेत.

हे सुद्धा वाचा

13 मंत्र्यांविरोधात गंभीर गुन्हे

या विश्लेषणानुसार, 15 (75 टक्के) मंत्र्यांच्या विरोधात गुन्हेगारी स्वरुपाचे खटले सुरू आहेत. त्यातील 13 (65 टक्के) मंत्र्यांच्या विरोधातील गुन्हे गंभीर स्वरुपाचे आहेत. विशेष म्हणजे शिंदे सरकारमधील सर्व मंत्री करोडपती आहेत. त्यांच्या संपत्तीचं मूल्य सरासरी 47.45 कोटी एवढं आहे.

लोढा सर्वाधिक श्रीमंत

एडीआरच्या रिपोर्टनुसार, मंगलप्रभात लोढा यांची संपत्ती सर्वाधिक आहे. त्यांच्याकडे 441.65 कोटीची संपत्ती आहे. तर सर्वात कमी संपत्ती पैठणमधून विजयी झालेले संदीपान भुमरे यांच्याकडे आहेत. त्यांच्याकडे केवळ 2.92 कोटी रुपयाची संपत्ती आहे. शिंदे सरकारमध्ये एकाही महिलेला स्थान देण्यात आलेलं नाही.

एकाकडेच डिप्लोमा

शिंदे सरकारमधील 8 (40 टक्के) मंत्र्यांची शैक्षणिक पात्रता इयत्ता 10 वी ते 12 वी एवढी आहे. तर 11 (55 टक्के) मंत्र्यांनी पदवीपर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षण घेतलेलं आहे. एका मंत्र्याकडे डिप्लोमा आहे.

चाळीशीच्या पुढच्या मंत्र्यांचा भरणा

याशिवाय चार मंत्र्यांचं वय 41 ते 50च्या दरम्यान आहे. इतर मंत्र्यांचं वय 51 ते 70च्या आता आहे, अशी माहितीही या अहवालात देण्यात आली आहे. अर्थात शिंदे मंत्रिमंडळाचा आणखी विस्तार बाकी आहे. त्यामुळे हे चित्रं बदलण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.