पिंपरी चिंचवडमध्ये भाजप नेत्याच्या घरावर टाकला ‘पेट्रोल बॉम्ब’

पिंपळेगुरवमध्ये ही घटना घडली. सांगवी पोलिसांकडून तोंडाला रुमाल बांधून आलेल्या त्या तिघांचा शोध सुरु

पिंपरी चिंचवडमध्ये भाजप नेत्याच्या घरावर  टाकला 'पेट्रोल बॉम्ब'
Breaking News
Follow us
| Updated on: Nov 23, 2021 | 7:39 PM

पिंपरी चिंचवड- चिंचवड विधानसभा भाजप आमदार लक्ष्मण जगतापांचे बंधू शंकर जगतापांच्या कार्यलयावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपळेगुरवमध्ये दुपारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या तीन अज्ञातांनी रॉकेलने भरलेल्या पेटत्या बाटल्या कार्यालयाच्या दिशेने फेकल्या. या घटनेत सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी झालेली नाही. आगीच्या फेकण्यात आलेल्या बाटल्यांपैकी एक बाटली खांबाला लागून फुटली तर दुसरी कार्यालया लगतच्या शटरवर पडल्याने हानी टाळली आहे. भाजप आमदार लक्ष्मण जगतापांचे बंधू शंकर जगताप हे बांधकाम व्यवसायिक आहेत.

कार्यकर्त्यांनी कार्यलयाच्या बाहेर गर्दी 

कार्यालयावर हल्ला झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी कार्यलयाच्या बाहेर गर्दी केली. दुचाकीवरून आलेल्या तिघांनी आपली तोंडे रुमालाने बांधली होती. घटनेची माहिती मिळताच सांगावी पोलीस तातडीन घटना स्थळावर दाखल झाले. अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हे हल्लेखोर नेमके कोण आहेत? की त्यांना कोणी पाठवलं होतं? याचा तपास सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Aurangabad: जायकवाडीत दुर्मिळ ‘युरेशियन कर्ल्यू’चं आगमन, जगात फक्त 7 हजार एवढी संख्या

दिवेआगारमधील चोरीस गेलेल्या सुवर्ण गणेश मूर्तीच्या मुखवट्याची अजितदादांच्या हस्ते प्रतिष्ठापना

सातारा, जावळीच्या राजकारणात यापुढे लक्ष घालणार, शिवेंद्रराजे यांना शशिकांत शिंदेंचा इशारा

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.