Aaditya Thackeray | जाहीर सभेत आदित्य ठाकरे यांचं भाकीत, हे सरकार किती तासांचं?

"मुख्यमंत्री हे गुजरातचे बसले आहेत. गुवाहाटीचे मुख्यमंत्री बसले आहेत. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातच नाही. पण आम्हाला वाटलं पोलीस कमिश्नर तरी कर्तृव्य तत्पर असतील. तिथे गेल्यानंतर ऑफिस सामसूम. कुणीच दिसत नाही. कारण सगळे वर्षा बंगल्यावर असतात", असा दावा आदित्य ठाकरेंनी केला.

Aaditya Thackeray | जाहीर सभेत आदित्य ठाकरे यांचं भाकीत, हे सरकार किती तासांचं?
Follow us
| Updated on: Apr 05, 2023 | 6:09 PM

ठाणे : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ठाण्यातील जनप्रक्षोभ यात्रेत भाषण करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), ठाण्याचे पोलीस आयुक्त यांच्यावर कडक शब्दांमध्ये निशाणा साधला. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे मारहाण प्रकरणावरुन आदित्य ठाकरे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना मोठा इशारा दिला आहे. हे सरकार काही महिन्यांचं नाही, काही दिवसांचं नाही. तर काही तासांचं आहे. त्यामुळे आमचं सरकार आल्यानंतर गद्दार गँगचे जे आयपीएस, आयएएस आणि इतर अधिकारी आहेत, त्यांच्याविरोधात बदल्याच्या भावनेतून नाही तर लोकांसाठी आम्ही चौकशी करु आणि जेलभरु. त्यांना जेलमध्ये टाकू, असा मोठा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

“कालपासून मला लोकांच्या मनात जो संताप दिसत आहे, या गद्दारांच्या सरकारबद्दल राग दिसत आहे, संपूर्ण महाराष्ट्रात ही ठिणगी पडली आहे. ठाण्यात कालदेखील आलो. आज आल्यानंतर माझ्या गाडीचे काच खालती करुन असताना जिथे जिथे थांबलो, मग बसमधील लोकं असतील, फुटपाथवरील लोकं असतील, रिक्षामधील लोकं असतील, सगळे मला थम्स अप करुन सांगतात की तुमच्यासोबत आम्ही आहोत. महाराष्ट्र सरकारमध्ये जी गद्दारी झाली आहे, जे सरकार महाराष्ट्रात बसलेलं आहे, ज्याला सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे की… नाही जाऊद्या”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

‘…तर पोलीस आयुक्त पळून गेले’

“आपल्याला आज 17 अटी आलेल्या आहेत. मोर्चा काढायचा असेल तर अमूकच बोलू शकतात. टाका, आमच्या सगळ्यांवर केसेस टाका पुन्हा होऊन जाऊदे. पोलीस आयुक्तांच्या ऑफिससाठी आम्ही एक टाळं आणलेलं आहे. कारण काल जेव्हा मिंधेंच्या गद्दार गँगच्या लोकांनी, टोळींनी जेव्हा शिंदे ताईंवर हल्ला केला, तेव्हा तक्रार घ्यायला तयार नव्हतं. उद्धव ठाकरे चिडून पोलीस आयुक्तालयात गेले तर पोलीस आयुक्त पळून गेले होते”, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला.

“एवढी मोठी घटना ठाणे शहरात झाली. जेव्हा एका गद्दार गँगचे आणि पक्षाचे कार्यकर्ते भिडतात. मिंधेंच्या लोकांनी शिंदे ताईंना मारलं. पोटात मारलं, ती ताई प्रेग्नंट असेल किंवा नसेल पण एका महिलेवर हात-पाय उचलले जातात. लाथा मारल्या जातात. कशासाठी तर एक पोस्ट टाकल्यामुळे. कुठेही काही कोणाकडून उत्तर येत नाही. पोलीस ठाण्याला गेलो तर तक्रार नोंद केली जात नाही. जणू काही मोगलाई आपल्या राज्यात आलीय. तशी आलीच आहे. कारण सगळे बाहेरुन आक्रमण होत आहेत”, अशी टीका त्यांनी केली.

‘आमचं सरकार आल्यावर त्या अधिकाऱ्यांना जेलमध्ये टाकणार’

“मुख्यमंत्री हे गुजरातचे बसले आहेत. गुवाहाटीचे मुख्यमंत्री बसले आहेत. आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महाराष्ट्रातच नाही. पण आम्हाला वाटलं पोलीस कमिश्नर तरी कर्तृव्य तत्पर असतील. तिथे गेल्यानंतर ऑफिस सामसूम. कुणीच दिसत नाही. कारण सगळे वर्षा बंगल्यावर असतात. याच्यावर एफआयआर टाका, त्याचं मोजमाप करा, सुरु असतं. तुम्हाला आज सांगतो, हे सरकार काही महिन्यांचं नाही, काही दिवसांचं नाही तर काही ताासांचं सरकार आहे. पडल्यानंतर सगळ्यांची मोजमापं काढणार”, असा दावा आदित्य ठाकरेंनी केला.

“कधी आम्ही बदल्याच्या भूमिकेत काम करत नाहीत. पण लोकांसाठी जे गरजेचं आहे ते आम्ही केल्याशिवाय राहणार नाहीत. जे कुणी ऑफिसर त्या गद्दार गँगचे असतील त्यांना सांगतोय मी, सरकार आल्यानंतर चौकशी करणार म्हणजे करणार आणि जेलभरो आंदोलन करणार. तुम्हाला जेलमध्ये भरणार. हीच शपथ मी दिघे साहेबांच्या शक्तीस्थळावर मी घेतली आहे”, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

“महिलांवर हात उचलायची, सुषमा ताई, सुप्रिया ताईंना शिवीगाळ करायची आणि मर्दानगी दाखवायची. असे लोकं एकदाच होतात. परत कधी येऊ द्यायची नाही. लोकशाही आहे की लोकशाही संपली? मोर्चा काढलं तर बोलायचं नाही तर आरती करायची का?”, असा सवाल त्यांनी केला.

“घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करायला आलो. स्वत:च्या शहरामध्ये, जो स्वत:चा बालेकिल्ला मानायचे, आता मानत नाहीत. कारण मी त्यांना सांगितलं की, ठाण्यातूनही लढून जिंकून दाखवणार. ठाणेकर मला स्वीकारायला तयार आहेत? मी त्या गद्दार गँगच्या नेत्याचं कौतुक करायला आलोय. सुसंस्कृत ठाणं म्हणून आपण ओळखतो त्या ठाण्याला आपण काल इतकं भयानक बदनाम करतोय. महिलेला मारहाण करता. तुम्ही माफी मागण्याच्या लायकीचे नाहीत. तुम्हाला माफ करणारही नाहीत”, असा घणाघात आदित्य ठाकरेंनी केला.

'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.