Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नारायण राणे यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करा, आपची मागणी; राणे यांना संसदेतील ‘तो’ शब्द भोवणार?

ठाकरे गटाला हिंदुत्वाचा अभिमान आहे तर 2019मध्ये तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं? सत्ता मिळवण्यासाठी तुम्ही भाजपला धोका देऊन शरद पवार यांच्याकडे गेलात. मी 1967 पासूनचा शिवसैनिक आहे.

नारायण राणे यांची मंत्रीपदावरून हकालपट्टी करा, आपची मागणी; राणे यांना संसदेतील 'तो' शब्द भोवणार?
Narayan RaneImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 7:03 AM

नवी दिल्ली | 9 ऑगस्ट 2023 : लोकसभेत अविश्वास ठरावावर सुरू असलेल्या चर्चे दरम्यान केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी उडाली. मणिपूरमधील हिंसेवर बोलत असताना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे, ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत आणि नारायण राणे यांच्यात चांगलीच जुंपली. श्रीकांत शिंदे यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधताच अरविंद सावंत यांनी शिंदे गटाला डरपोक म्हटलं. तर नारायण राणे यांनी ठाकरे गटाची लायकीच काढली. त्यावर आम आदमी पार्टीने आक्षेप घेत राणे यांना सस्पेंड करण्याची मागणी केली आहे.

लोकसभेत काय घडलं?

अविश्वास ठरावावरील चर्चेत नारायण राणे यांनी भाग घेतला. यावेळी राणे यांनी ठाकरे गटावर जोरदार टीका केली. यावेळी राणे यांनी ठाकरे गटाची औकात काढली. आमच्या पंतप्रधानांवर बोलण्याची कुणाला अधिकार नाही. तुमची औकात नाहीये. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर टीका करण्याची कुणाचीही औकात नाहीये, असं नारायण राणे यांनी म्हटलं. राणे यांनी अपशब्द वापरताच लोकसभेचे पीठासीन अध्यक्ष राजेंद्र अग्रवाल यांनी राणे यांना मध्येच थांबवलं. व्यक्तिगत टीका करू नका म्हणून सांगितलं. तसेच राणेंना बसायला सांगितलं. अध्यक्षांनी दोनदा राणेंना टोकलं आणि खाली बसायला सांगितलं.

हे सुद्धा वाचा

सावंतांनंतर राणे बोलत होते

ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी आधी लोकसभेत चर्चेत भाग घेतला. त्यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. श्रीकांत शिंदे यांच्या आरोपांचं खंडन करत शिंदे गटाचा पळपुटे असा उल्लेख केला. त्यामुळे नारायण राणे बोलायला उभे राहिले. अविश्वास ठरावावर उद्धव ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांचं भाषण ऐकल्यावर मी दिल्लीत नव्हे तर महाराष्ट्र विधानसभेत बसलो की काय असं मला वाटलं, असं नारायण राणे म्हणाले.

ठाकरे गटाला हिंदुत्वाचा अभिमान आहे तर 2019मध्ये तुमचं हिंदुत्व कुठं गेलं होतं? सत्ता मिळवण्यासाठी तुम्ही भाजपला धोका देऊन शरद पवार यांच्याकडे गेलात. मी 1967 पासूनचा शिवसैनिक आहे, असं नारायण राणे म्हणाले. ते ऐकताच विरोधक आक्रमक झाले. त्यामुळे राणे अधिकच खवळले. अरे बस… मागे बस… असं राणे विरोधकांना म्हणाले. राणे यांच्या या भाषेवर लोकसभा अध्यक्षाने आक्षेप घेत त्यांना थांबण्यास सांगितलं.

आपचं ट्विट

दरम्यान, आम आदमी पार्टीने ट्विट करून राणे यांच्या हकालपट्टीची मागणी केली आहे. मोदींचे मंत्री नारायण राणे लोकसभेत एखाद्या गल्लीतील गुंडांसारखी धमकी देत आहेत. मोदी सरकारला केवळ प्रश्न विचारला तरी खासदाराला सस्पेंड केलं जातं. त्यामुळे अभद्र भाषेचा प्रयोग केल्यामुळे भाजपच्या मंत्र्याला सस्पेंड केलं जाणार का? असा सवाल आपने केला आहे. आपने ट्विटमधील राणेंचा लोकसभेतील व्हिडीओही पोस्ट केला आहे.

मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका.
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली.
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका.
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा.
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.