महाराष्ट्र आणि झारखंडबाबत आपचा मोठा निर्णय, भाजपला खिंडीत गाठण्यासाठी मोठी खेळी?

आम आदमी पक्ष महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार नाही. दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीवर फोकस करण्यासाठी आपने हा निर्णय घेतला आहे. आपने इंडिया आघाडीत असतानाही काही राज्यांमध्ये निवडणूक लढवली होती. मत विभागणी झाल्याने त्याचा फायदा भाजपला झाला होता.

महाराष्ट्र आणि झारखंडबाबत आपचा मोठा निर्णय, भाजपला खिंडीत गाठण्यासाठी मोठी खेळी?
arvind kejriwalImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 17, 2024 | 1:38 PM

हरियाणातील काँग्रेसच्या पराभवानंतर इंडिया आघाडीचे नेते सावध झाले आहेत. फाटाफुटीचा महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेच्या निवडणुकीत फटका बसू नये म्हणून इंडिया आघाडीच्या नेत्यांनी ताकही फुंकून पिण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम आदमी पार्टीने महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही राज्यांच्या निवडणुकीत आप इंडिया आघाडीला पाठिंबा देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. आम आदमी पार्टीच्या या खेळीमुळे दोन्ही राज्यात भाजपला मोठा फटका बसू शकतो असं सांगितलं जात आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आम आदमी पक्ष महाराष्ट्र आणि झारखंडमध्ये विधानसभा निवडणूक लढवणार नाही. दिल्लीतील आगामी विधानसभा निवडणुकीवर फोकस करण्यासाठी आपने हा निर्णय घेतला आहे. आपने इंडिया आघाडीत असतानाही काही राज्यांमध्ये निवडणूक लढवली होती. मत विभागणी झाल्याने त्याचा फायदा भाजपला झाला होता. ही मत विभागणी टाळण्यासाठी आता आपने मोठा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. मात्र. इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या दबावामुळेच आपने हा निर्णय घेतल्याचंही बोललं जात आहे.

हरियाणात पराभव

नुकतेच हरियाणा विधानसभेचे निकाल लागले आहेत. या निवडणुकीत आपला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. आपने हरियाणात 88 जागांवर उमेदवार उमेदवार उभे केले होते. त्यापैकी 87 जागांवर त्यांचा अत्यंत दारूण पराभव झाला होता. त्यामुळेच आपने आता महाराष्ट्रात निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रातील आप नेत्यांना काही जागांवर निवडणूक लढवायची होती. पण आपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याला नामंजुरी दिल्याचं सांगितलं जात आहे.

दिल्लीवरच फोकस

आम आदमी पार्टीचा सर्वात चांगला बेस दिल्लीत आहे. दिल्लीत आपची सत्ता आहे. मात्र लोकसभा निवडणुकीत आपला दिल्लीत मोठा पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आपने इतर राज्यांच्या निवडणुकीत गुंतून न राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी जास्तीत जास्त फोकस दिल्लीवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत विधानसभेवर पुन्हा सत्ता आणण्यासाठी अरविंद केजरीवाल हे खास रणनीती आखण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.