‘नितेश राणे हे पहिले हँग, चाराण्यासारख्या गोष्टी करतात’, अब्दुल सत्तारांची टीका

"नितेश राणे हे पहिले हँग आहेत. त्यांना काही कळत नाही आणि ते चाराण्यासारख्या गोष्टी करतात", असा घणाघात त्यांनी केला (Abdul Sattar slams Nitesh Rane).

'नितेश राणे हे पहिले हँग, चाराण्यासारख्या गोष्टी करतात', अब्दुल सत्तारांची टीका
Follow us
| Updated on: Jan 11, 2021 | 7:36 PM

वर्धा : राज्य सरकारने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप नेते नारायण राणे यांच्यासह अनेक बड्या नेत्यांच्या सुरक्षा व्यवस्थेत कपात केली. तर काही मंत्री, त्यांचे कुटुंबिय यांच्यासह युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना एक्स दर्जाची सुरक्षाव्यवस्था पुरवण्यात आली. याच गोष्टीवरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेला शिवसेना नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “नितेश राणे हे पहिले हँग आहेत. त्यांना काही कळत नाही आणि ते चाराण्यासारख्या गोष्टी करतात”, असा घणाघात त्यांनी केला (Abdul Sattar slams Nitesh Rane).

“चाराण्यासारख्या गोष्टी करणाऱ्यांनी अशाप्रकारे बोलावं याचं मला आश्चर्य वाटतंय. कोणाला सुरक्षा द्यावी कोणाला नाही द्यावी हे शासन ठरवेल. अभिनेत्री कंगणा रनौतला सुरक्षेची किती गरज होती? हे आपण केंद्र सरकारला विचारलं पाहिजे. कंगणाला अशी सुरक्षा दिली की तशी महाराष्ट्रात मंत्र्याला सुरक्षा नाही. कंगणाला मंत्र्यापेक्षाही जास्त सुरक्षा देण्यात आली. सुरक्षेची कुणाला आणि किती आवश्यकता आहे? याचा रिपोर्ट प्रशासन देते, त्यानुसार सुरक्षा दिली जाते”, अशी प्रतिक्रिया सत्तार यांनी दिली (Abdul Sattar slams Nitesh Rane).

नितेश राणे नेमकं काय म्हणाले होते?

“सरदेसाईंच्या मुलाला सुरक्षा देऊन महाराष्ट्र सरकारने एक महत्वाचं आणि योग्य पाऊल उचललं आहे. त्याला जास्त सुरक्षेची नितांत गरज होती. कारण त्याने मंत्रालयातील अनेक फाईल्स दाबून ठेवल्या आहेत. त्यामुळे अनेक नोकरशाह त्याच्यावर नाराज आणि संतापलेले आहे. त्यामुळे त्याला सुरक्षा पुरवण्याची खऱ्या अर्थाने गरज होती”, असं ट्वीट करत नितेश राणे यांनी सरकारच्या सुरक्षाव्यवस्थेतील बदलांवरुन टीका केली आहे.

पाहा आखाडा, दररोज दु. 4 वा टीव्ही 9 मराठीवर

मनसेचीदेखील टीका

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनीही वरुण सरदेसाई यांना पुरवण्यात आलेल्या सुरक्षेवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. कोरोना काळातील राज्य सरकारची मोहीम असलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’वरुन देशपांडे यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय.

संबंधित बातमी : 

वरुण सरदेसाईंच्या सुरक्षा व्यवस्थेवरुन आमदार नितेश राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.