उर्मिला मातोंडकर महाराष्ट्रासाठी चांगलं काम करतील; आदित्य ठाकरेंनी दिल्या शुभेच्छा
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांच्या या नव्या इनिंगला शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. (Aditya Thackeray welcomed Urmila Matondkar to Shiv Sena)
मुंबई: अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला असून त्यांच्या या नव्या इनिंगला शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. उर्मिला मातोंडकर महाराष्ट्रासाठी चांगलं काम करतील, अशा शुभेच्छा आदित्य ठाकरे यांनी दिल्या आहेत. (Aditya Thackeray welcomed Urmila Matondkar to Shiv Sena)
प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांनी मोजक्याच शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली. उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांना भेटून खरोखर आनंद झाला. महाराष्ट्रासाठी त्या चांगलं काम करतील, अशी आशा आदित्य यांनी व्यक्त केली.
आज दुपारी एक वाजता उर्मिला मातोंडकर यांनी ‘मातोश्री’त जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी शिवबंधन बांधून त्यांना शिवसेनेत प्रवेश दिला. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, खासदार प्रियांका चतुर्वेदी, अनिल देसाई, महापौर किशोरी पेडणेकर, मीना कांबळी आदी उपस्थित होते.
बाळासाहेबंना मिस करतेय
शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी शिवसेना प्रमुख, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला अभिवादन केलं. “बाळासाहेब असायला हवे होते, असं फार वाटतंय. मी त्यांना खूप मिस करतेय’, अशी प्रतिक्रिया उर्मिला यांनी यावेळी व्यक्त केली.
दरम्यान, उर्मिला मातोंडकर या शिवसेनेकडून विधानपरिषदेवर जाणार आहेत. शिवसेनेने राज्यपाल नियुक्त सदस्यांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे पाठवली असून त्यात मातोंडकर यांच्या नावाची कलाकार कोट्यातून शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे त्या लवकरच विधानपरिषदेच्या सदस्या झालेल्या पाहायाला मिळणार आहेत. (Aditya Thackeray welcomed Urmila Matondkar to Shiv Sena)
Welcomed @UrmilaMatondkar ji into the @ShivSena family today, look forward to working together and serve our nation pic.twitter.com/uGfOzYPcJx
— Aaditya Thackeray (@AUThackeray) December 1, 2020
संबंधित बातम्या:
Photo : बनारसी सिल्क साडी, गळ्यात साज, बाळासाहेबांना वंदन; उर्मिलाच्या हाती शिवबंधन!
उर्मिला मातोंडकरचा काँग्रेसला रामराम, कारण…
(Aditya Thackeray welcomed Urmila Matondkar to Shiv Sena)