चंद्रकांत पाटील म्हणाले, मुलाच्या लग्नासाठीही उद्धव ठाकरे केंद्राला पत्र लिहितील, आता आदित्य ठाकरेंचं उत्तर

आदित्य ठाकरे यांनीच प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्या लग्नाची एवढी चिंता का? असा प्रतिप्रश्न करत आदित्य यांनी चंद्रकांतदादांनाच चिमटा काढलाय.

चंद्रकांत पाटील म्हणाले, मुलाच्या लग्नासाठीही उद्धव ठाकरे केंद्राला पत्र लिहितील, आता आदित्य ठाकरेंचं उत्तर
आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 5:56 PM

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या लग्नाचा उल्लेख केला. आदित्य ठाकरेंना लग्नासाठी मुलगी शोधायची असेल तरी उद्धव ठाकरे केंद्राला पत्र लिहतील, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केलीय. त्याला आता खुद्द आदित्य ठाकरे यांनीच प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्या लग्नाची एवढी चिंता का? असा प्रतिप्रश्न करत आदित्य यांनी चंद्रकांतदादांनाच चिमटा काढलाय. इतकंच नाही तर चंद्रकांत पाटील यांच्या संदर्भात मी वेगळी चर्चा करेल, असंही आदित्य ठाकरे म्हणालेत. (Aditya Thackeray’s reply to Chandrakant Patil’s criticism about marriage)

राज्य सरकार काहीही झालं तरी केंद्र सरकारकडे बोट दाखवतं. त्यामुळे उद्या आदित्य ठाकरे यांना लग्नासाठी मुलगी बघायची वेळ आली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्र सरकारला पत्र लिहतील, अशी उपरोधिक टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यावर उत्तर देताना आदित्य ठाकरे यांनी चंद्रकांत पाटील यांना चिमटा काढलाय. चंद्रकांत पाटील यांच्या संदर्भात मी वेगळी चर्चा करेल. आता वातावरण चांगलं ठेवावं. राहिला प्रश्न माझ्या लग्नाचा तर माझ्या लग्नाची एवढी चिंता का? असा प्रतिप्रश्न आदित्य ठाकरे यांनी केलाय. त्याचबरोबर आशिष शेलार यांच्या आरोपाबाबत आपण ऐकलं नाही, असं सांगत आदित्य ठाकरे यांनी शेलारांच्या आरोपांवर बोलण्यास नकार दिला. वसुंधरा दिन साजरा करण्याबाबत आज बैठक पार पडल्याचंही त्यांनी सांगितलं.

पवार-फडणवीस भेट राजकीय नव्हती- चंद्रकांत पाटील

शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट राजकीय नव्हती. शरद पवार आजारी असल्यामुळेच देवेंद्र फडणवीस त्यांना भेटायला गेले होते. फडणवीस यांनी शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यामध्ये काहीही राजकीय नव्हते. आजदेखील देवेंद्र फडणवीस हे जळगावात नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेले आहेत, असे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

संजय राऊतांची अवस्था ‘ना घरका ना घाटका’

फडणवीस आणि शरद पवार भेटीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केलीय. त्याबाबत जळगाव दौऱ्यावर असलेल्या फडणवीसांना प्रश्न विचारला असता त्यांनी राऊतांना जोरदार टोला हाणलाय. संजय राऊत यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी झाली आहे. याचा वाईट अर्थ घेऊ नका, ते चांगले संपादक आहेत. पण ते नेमके कुणाचे आहेत, असा प्रश्न सातत्याने पडतो. त्यातच आता सामनाच्या मुख्य संपादक आमच्या वहिनी म्हणजे रश्मीताई ठाकरे आहेत. त्यामुळे संजय राऊत यांची अवस्था सध्या ‘ना घरका ना घाटका’ अशी झाली असल्याची टीका फडणवीसांनी केलीय.

संबंधित बातम्या :

‘ओबीसी आरक्षणाचा तिढा सुटेपर्यंत राज्यात निवडणूका नको’, मंत्री विजय वडेट्टीवारांची भूमिका

मुदतपूर्व निवडणूक ते 30 वॉर्ड फोडण्याचे प्रयत्न, शिवसेनेचं कारस्थान, आशिष शेलारांचे 4 मोठे आरोप

Aditya Thackeray’s reply to Chandrakant Patil’s criticism about marriage

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.