का मारली असेल मी मिठी त्याला?… राहुल गांधी यांना मिठी मारल्यानंतर विवाहितेची पोस्ट चर्चेत

कल्पना सूर्यवंशी-गेडाम असं या महिलेचं नाव आहे. ही महिला विवाहीत आहे. तिला 17 वर्षाची मुलगी आहे. या महिलेला राहुल गांधींना भेटण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. राहुल गांधी हे आश्वासक आणि प्रगल्भ नेते आहेत.

का मारली असेल मी मिठी त्याला?... राहुल गांधी यांना मिठी मारल्यानंतर विवाहितेची पोस्ट चर्चेत
का मारली असेल मी मिठी त्याला?... राहुल गांधी यांना मिठी मारल्यानंतर विवाहितेची पोस्ट चर्चेत Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 20, 2022 | 5:32 PM

बुलढाणा: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो यात्रे’ला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. हजारो लोक त्यांच्या पदयात्रेत सामील होत आहेत. राहुल गांधी यांचा साधेपणा, एवढ्या मोठ्या घराण्यातील असूनही निगर्वीपणा, आस्थेवाईक विचारपूस करण्याची पद्धत आणि समोरच्याचं म्हणणं ऐकून घेण्याची नम्रता… राहुल गांधी यांच्या या स्वभावाची अनेकांना भूरळ पडत आहे. अनेक सेलिब्रिटींपासून ते सामान्य लोकांना राहुल गांधी यांची भूरळ पडली आहे. एका विवाहीत महिलेवरही राहुल गांधी यांच्या साधेपणाची आणि सच्चेपणाची प्रचंड छाप पडली. त्यामुळे ती भारत जोडो यात्रेत सामील झाली अन् राहुल गांधी यांना भेटण्याची संधी मिळताच त्यांना मिठीही मारली. या महिलेने त्यानंतर लिहिलेली फेसबुक पोस्ट सध्या चर्चेत आहे.

कल्पना सूर्यवंशी-गेडाम असं या महिलेचं नाव आहे. ही महिला विवाहीत आहे. तिला 17 वर्षाची मुलगी आहे. या महिलेला राहुल गांधींना भेटण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची इच्छा होती. राहुल गांधी हे आश्वासक आणि प्रगल्भ नेते आहेत.

हे सुद्धा वाचा

स्वातंत्र्याचा इतिहास जोडला गेलेल्या घराण्यातून असूनही राहुल गांधी प्रचंड साधे आहेत. त्यांचा हा साधेपणा त्यांना भावला होता. पण राहुल गांधी यांना भेटण्याची संधी मिळत नव्हती. अखेर ती भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने मिळाली.

त्यामुळे त्या कल्पना या आपल्या पतीसह भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या. या यात्रेत राहुल गांधी यांच्याशी बोलण्याची संधी मिळताच त्यांनी कुणाचीही पर्वा न करता राहुल गांधी यांना मिठी मारली. राहुल गांधी यांना भेटण्याचं त्यांचं अनेक वर्षाचं स्वप्न पूर्ण झालं.

या भेटीनंतर त्यांनी राहुल गांधी यांच्याबाबतच्या मनातील भावना फेसबुकवर व्यक्त केल्या. राहुल गांधी यांना का मिठी मारली याचं कारण दिलं. तसेच राहुल गांधी यांच्या बद्दल त्यांची काय मते आहेत तीही मांडली. त्यांनी मांडलेली मते अप्रतिम आहेत. जणू काही देशातील जनतेच्या मनातीलच भावना त्यांनी या पोस्टमधून व्यक्त केल्या आहेत.

कल्पना यांची पोस्ट जशीच्या तशी

का मारली असेल मी मिठी त्याला… मी काही कोणी नवथर तरूणी नाही.. ना तो कोणी पंचवीस वर्षाचा शाइन मारणारा तरूण… पण तरीही एका स्त्री ने, एका आईने ,एका पत्नी ने हजारों लोकांसमोर अशी कोणाला मिठी मारावी… समाजात एका प्रतिष्ठित व्यक्ती ची बायको म्हणून वावरताना,प्रत्येक लहानसहान गोष्ट करताना लोक काय म्हणतील हा विचार करणाऱ्या स्त्रीने अशी परक्या व्यक्तीला अख्ख्या जगासमोर मिठी का मारली असेल… मी त्याला भेटल्याचा आनंद माझ्याहून ही जास्त कोणाला झाला असेल तर तो माझ्या मुलीला.. ती मुलगी म्हणजे कोणी चार पाच वर्षाची चिमणी नाही, जी फोटोत आई दिसतंय सगळीकडे म्हणून खुश होणारी… ती आता साडे सतरा वर्षाची एक प्रगल्भ आणि ठाम विचार करणारी तरूणी आहे.. एका बारावीत शिकणाऱ्या तरुण मुलीच्या आईने का मारली असेल अशी मिठी त्याला! तेही अगदी नवरा सोबत असताना..

सर्वात आधी तो फोटो मी तिला पाठवला होता… ” लहानपणापासून मी ऐकून ऐकून मी थकली होती राहुल गांधी ला भेटायचं आहे. चला आता भेटलीस एकदाची तू त्याला ” हे तिचं पहिलं वाक्य… स्त्रीला स्पर्शाची भाषा चांगलीच अवगत असते.. अगदी पुरूषाच्या नजरेतून तिला ते कळते की त्याच्या मनात काय असेल.. अशीच नाही ती कोणालाही मिठ्या मारत फिरत..

राहुलला भेटणं हे माझं स्वप्न होतं तेव्हापासून.. जेव्हा तो कोणीच नव्हता आणि लोकांच्या भाषेत पप्पू होता.. का भेटायचं होतं मला त्याला तर तो नेहमीच मला आपला माणूस वाटला.. द्वेष पसरवणाऱ्या या समाजात प्रेम वाटत फिरणारा, प्रेमाची खरी किंमत कळणारा राहुल.. बालवयात आजी नी तरूणपणी वडील गमावणारा तरीही मनात कुठेही राग, द्वेष न ठेवता मारेकऱ्यांना माफ करणारा मोठ्या मनाचा माणूस.. कठीण परिस्थितीत न डगमगता आई, बहिणीला सांभाळणारा खंबीर राहुल.. कसलाही भेद न करता माणसाला माणूस म्हणून वागवणारा प्रेमाचा खळखळता झरा म्हणजे राहुल.. लोकांनी कितीही हिणवून टिकाटिपण्णी केली तरी कुठलाही आक्रस्ताळेपणा न करणारा संस्कारी राहुल.. त्याच्या मृदु बोलण्याने आणि गोड हसण्याने भुरळ पाडणारा राहुल.. त्याच्या डोळ्यात बघताच सारं जग विसरायला लावणारा राहुल.. काही लोकांच्या कपटनीतीचा भाग होऊन जगापुढे हसं झालेला पण तरीही आपला चांगुलपणा न सोडणारा राहुल.. बापाच्या शरीराच्या चिंध्या झालेल्या असतानाही असा बिनधास्त रस्त्यावर उतरायला जिगरा लगता है यारों..

त्याला पप्पू म्हणा किंवा कोणी काहीही म्हटलं तरी तो ठासून खोटं बोलणारा खोटारडा, क्रूर, खुनशी, कपटी नाही हेच माझ्यासाठी खूप आहे.. राहुल गांधी एक जिवंत प्रेमळ,आपलासा वाटणारा एक साधा मनुष्य आहे तुमच्या आमच्या सारखा.. आज त्याच्या भोवती एक वलय तयार झालंय.. आज प्रत्येकाला त्याला मिठी मारायची आहे.. अगदी लहानमोठे,स्त्री, पुरुष सगळ्यांना.. आहेच तो तसा विश्वासक,आपला वाटणारा..

माझंही तसंच झालं अगदी अनपेक्षितपणे तो मला भेटला.. त्याक्षणी माझी काय अवस्था झाली असेल माझं मलाच माहीत आहे.. मला नाही आठवत मी काय बोलले पण मी त्याला मिठी मारली.. तिथे उपस्थित लोक काय विचार करतील ,कोणी फोटो घेईल किंवा आणखी कसलाही विचार माझ्या डोक्यात नव्हता.. एक संमोहन अवस्था होती ती.. माझ्या डोळ्यासमोर माझा आवडता राहुल गांधी होता आणि मी होती.. बाकी सारं जग जणू थांबलं होतं त्या क्षणाला.. मला नाही आठवत समोर पोझ देत काढलेला फोटो कधी काढला किंवा मी कधी तशी त्याच्या कमरेत हात घालून पोझ दिली.. अगदी आता पाच दिवसानंतर ही मी ब्लँक आहे..

पण मी त्याला भेटली, गुलाब दिला, हात धरून चालली, बोलली, मिठी मारली.. हे सत्य आहे!! तो आनंद, उत्साह आणि आपुलकीचा क्षण आयुष्यभरासाठी कायम माझ्या मनात कोरल्या गेलाय! प्रत्येक पुरुष असा आश्वासक आणि विश्वासक असेल त्या दिवशी या देशातील प्रत्येक स्त्री सुरक्षित असेल!! ❤️ क्योंकी वो अपनासा लगता हैं ❤️ Rahul Is Love ❤️ Love you Rahul ?? #RahulGandhi #BharatJodoYatra कल्पना सुर्यवंशी गेडाम ब्रम्हपुरी ??

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.