महाविकास आघाडी जिंकल्यास फडणवीस दिल्लीत जातील; अशोक चव्हाण यांचा दावा

विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी होत असलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडी जिंकल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जातील, असा दावा, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. (after mlc election devendra fadnavis will go to center politics says ashok chavan)

महाविकास आघाडी जिंकल्यास फडणवीस दिल्लीत जातील; अशोक चव्हाण यांचा दावा
Follow us
| Updated on: Nov 27, 2020 | 3:44 PM

नांदेड: विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी होत असलेल्या निवडणुकीत महाविकास आघाडीचाच विजय होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी जिंकल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जातील. त्यांना महाराष्ट्रात ठेवलं जाणार नाही, असा दावा, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. (after mlc election devendra fadnavis will go to center politics says ashok chavan)

नांदेड येथे सतिश चव्हाण यांचा प्रचार करण्यासाठी अशोक चव्हाण नांदेडमध्ये आले होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्यात त्यांनी हा दावा केला. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी होत असलेल्या निवडणुकीत आपला विजय निश्चित आहे. या विजयानंतर भाजप नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात ठेवणार नाही. त्यांना दिल्लीत जावं लागेल, असा दावा चव्हाण यांनी केला.

दोन दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी नांदेडमध्ये आले होते. त्यावेळी त्यांनी राज्यातील ठाकरे सरकारला बोलबच्चन सरकार म्हटलं होतं. त्याचाही चव्हाण यांनी समाचार घेतला. बोलबच्चन हा शब्द तुम्हालाच लागू पडतो. 15 लाख रुपये देण्याचे आश्वासन कोणी दिले होते? दोन कोटी नोकऱ्या देण्याचं आश्वासन कोणी दिलं होतं. नोटाबंदीचा प्रयोग यशस्वी करण्याचं आश्वासन कुणी दिलं होतं? असा सवाल करतानाच मग बोलबच्चन कोण? बोलबच्चन तर तुम्हीच. आम्ही नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.

यावेळची निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आणि वेगळी आहे. पहिल्यांदाच पंजा, घड्याळ आणि धनुष्यबाण एकत्र आल्याने ही निवडणूक अनोखी ठरणार आहे. शिवाय आपले सरकार आल्यानंतरची ही पहिली निवडणूक आहे. आता तिन्ही पक्ष एकत्र आल्याने आपणच जिंकणार आहोत, असंही ते म्हणाले. राज्यातला सर्व पैसा आरोग्य व्यवस्थेवर खर्च झाला आहे. कोरोनावर मात करण्यात आपण यशस्वी होत आहोत. दुसरी लाट येऊ नये यासाठी प्रयत्नशील आहोत, असं त्यांनी स्पष्ट केलं.

विरोधकांचं स्वप्न पूर्ण होणार नाही

मी पुन्हा येईनच्या वलग्ना करणाऱ्यांना कार्यकर्ते टिकवण्यासाठी सरकार जाणार अश्या वावड्या उठवाव्या लागतात. पण त्यांचे हे स्वप्न पूर्ण होणार नाही. ठाकरे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल. त्यामुळे विरोधकांच्या स्वप्नांना काहीही अर्थ उरत नाही, असंही ते म्हणाले. (after mlc election devendra fadnavis will go to center politics says ashok chavan)

संबंधित बातम्या:

ठाकरे सरकार पूर्णपणे अपयशी, आता जमत नाही म्हणा आणि सोडून द्या : चंद्रकांत पाटील

हे तर तिघाडीच्या परावलंबी सरकारचे ‘परावलंबी वर्ष’; आशिष शेलारांचा टोला

पुढच्या निवडणुका एकत्र लढवून सरकार रिपीट होणार, भुजबळांना विश्वास

(after mlc election devendra fadnavis will go to center politics says ashok chavan)

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.