आता वय झाले, निवृत्ती घ्या, पण… अजित पवार यांनी मोकळी केली मनातील सर्व खदखद

Ajit Pawar and Sharad Pawar : शरद पवार यांचे नाव न घेता अजित पवार म्हणाले, माझी त्यांना विनंती त्यांनी आता थांबावे. माघार घ्यावी. उद्या त्यांनी सभा घेतल्या तर मलाही सभा घ्यावा लागतील, उत्तर द्यावे लागले, असे अजित पवार यांनी सांगितले.

आता वय झाले, निवृत्ती घ्या, पण... अजित पवार यांनी मोकळी केली मनातील सर्व खदखद
Follow us
| Updated on: Jul 05, 2023 | 3:09 PM

मुंबई : कुठेही वय झाले की निवृत्ती घेतली जाते. राजकरण, शेती, उद्योग सर्वच क्षेत्रात हा प्रकार आहे. भाजपमध्ये लालकृष्ण आडवाणी यांनी निवृत्त घेतली होती. आता तुमचेही वय ८२ झाले आहे. तुम्ही कधी थांबणार आहात की नाही. आम्हाला आशीर्वाद द्या, आमचे कुठे चुकले तर सांगा ना. आपल्या घरातसुद्धा शेतकरी सांगतो, तू आता २५ वर्षांचा झाला. आता तू शेती पाहा मी सल्ला देईल. उद्योगपतींमध्येही ती पद्धत आहे. मग तुम्ही ती पद्धत का अवलंबत नाही, असा प्रश्न अजित पवार यांनी शरद पवार यांना विचारला. माझी अजून माझ्या पांडुरंगला विनंती आहे , आम्हाला आशीर्वाद द्यावे, त्यांनी थांबावे, असे भावनिक आवाहन अजित पवार यांनी शरद पवार यांना सांगितले.

सुप्रिया सुळे काय म्हणाल्या…

शरद पवार यांना आधी मला सांगितले की मी राजीनामा देतो, मी संस्था पाहतो. एक कमिटी करतो. त्यावेळी सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय अध्यक्ष करा, असे सांगितले. दोन दिवसांत काय झाले माहीत नाही. दोन दिवसांत राजीनामा मागे घ्यायचा होता तर दिला का? माझ्यात सत्ता चालवण्याची धमक नाही का? राज्यात जे प्रमुख चार-पाच लोकांची नावे घेतली जाते, त्यात माझे नाव येते की नाही? असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला. शरद पवार यांच्यासंदर्भात मी सुप्रिया सुळे यांनाही सांगितले. त्या म्हणाल्या, ते हट्टी आहेत. ते ऐकत नाही.

हे सुद्धा वाचा

आपला राष्ट्रीय पक्ष राज्याचा झाला

राष्ट्रीय पक्ष राज्याचा पक्ष झाला आहे. आपली राष्ट्रीय पक्षाची मान्यता रद्द झाली. ती आपणास परत मिळवायची आहे. २०२४ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा ७१ आकडा पुढे घेऊन जाणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढू. राष्ट्रवादीला चांगल्या जागा मिळवून देऊ, असे अजित पवार यांनी सांगितले.

साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिका डॉ. तारा भवाळकर.
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य
अलर्ट राहा, कधीही ब्रेकिंग मिळू शकेल, नीलम गोऱ्हेंचं सूचक वक्तव्य.
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'
शिंदेंना धक्का, माजी नगरसेवकांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती 'मशाल'.
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'
राऊतांचा गुलाबराव पाटलांवर निशाणा, 'रेडे गुवाहाटीलाच मारले, डुक्कर..'.
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?
तुम्ही खुनी; कोणत्या तोंडाने मतं मागणार? सुळेंचा कोणावर हल्लाबोल?.
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड
शिवरायांचं स्मारक पाहण्यास मुंबईत संभाजीराजे अन् पोलिसांकडून धरपकड.
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा
'त्यांची दादागिरी संपली', बच्चू कडू यांचा अजित पवारांवर निशाणा.
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी
शिंदेंच्या मंत्र्यानं वाटलेल्या साड्यांची संतप्त महिलांनी केली होळी.
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक
'... तर मी 2 वेळेचं जेवले असते', लाडकी बहीण'चं आशा भोसलेंकडून कौतुक.
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद
नवनीत राणांचा तुफान गरबा, तरुणींसोबत लुटला गरबा खेळण्याचा आनंद.