महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का? मुख्यमंत्र्यांचं नेमकं उत्तर, बाळासाहेब थोरात, अजितदादांच्या चेहऱ्यावर हसू

पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीवरुन प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानंतर एकच हशा पिकला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केलीय. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावलाय.

महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का? मुख्यमंत्र्यांचं नेमकं उत्तर, बाळासाहेब थोरात, अजितदादांच्या चेहऱ्यावर हसू
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
Follow us
| Updated on: Jul 06, 2021 | 6:16 PM

मुंबई : विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनात झालेल्या जोरदार राड्यानंतर आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या भेटीवरुन प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरानंतर एकच हशा पिकला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांवर जोरदार टीका केलीय. तसंच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही टोला लगावलाय. (Ajit Pawar and Balasaheb Thorat laugh at CM Uddhav Thackeray’s statement)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीन आठवड्यांपूर्वी राजधानी नवी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील होते. मात्र मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्यात वैयक्तिक तीस मिनिटे चर्चा झाली. या भेटीनंतर राज्यामध्ये राजकीय उलथापालथ होणार, अशी चर्चा रंगते आहे. महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान देखील अशा बातम्या येत राहिल्या. आज पत्रकार परिषदेदरम्यान मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न विचारण्यात आला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या उत्तराने अजित दादा आणि बाळासाहेब थोरात यांच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.

बाळासाहेब थोरात, अजितदादांना हसू अनावर

महाराष्ट्र विधीमंडळाचं दोन दिवसीय अधिवेशन पार पडल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकारांना संबोधित केलं. या वेळी महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, “तीस वर्ष सोबत असूनही भाजपसोबत काही घडलं नाही, मग आता काय घडेल??” मुखक्यामंत्र्यांच्या उत्तराने शेजारी बसलेल्या बाळासाहेब थोरात आणि अजित दादांना देखील हसू अनावर झालं. त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर स्मितहास्य पाहायला मिळालं.

देवेंद्र फडणवीसांना टोला

विधानसभेत झालेल्या राड्यामुळे विधिमंडळातील सर्वात ज्येष्ठ सदस्य असलेले बाळासाहेब थोरातही अवाक झाले आहेत, मी तर अगदीच नवखा आहे. कालचा संपूर्ण प्रकार पाहून उत्कृष्ट संसदपटूचा दर्जा खालावला असल्याचं पाहायला मिळतयं, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टोला लगावलाय. सोमवारी विधानसभेत जे काही झालं ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला लाजिरवाणं आहे. कालचं चित्र मान शरमेनं खाली घालणारं होतं. वेडं वाकडं वागायचं, आरडाओरड करायचा ही लोकशाही नाही. माईक असतानाही बेंबीच्या देठापासून ओरडाचं हे चूक असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

संबंधित बातम्या :

उत्कृष्ट संसदपटूचा दर्जा खालावला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

“भाजप आमदारांचं निलंबन मागे घ्या, अन्यथा ठाकरे सरकारमधील मंत्र्यांना रस्त्यावर फिरु देणार नाही”

Ajit Pawar and Balasaheb Thorat laugh at CM Uddhav Thackeray’s statement

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.