Devendra Fadnavis : फडणवीस सरकारमध्ये अजित पवार विरोधी पक्षनेते?, तर विधानपरिषदेचं नेतृत्व नाथाभाऊंकडे?; खडसे-फडणवीस सामना रंगणार?

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये शिवसेनेकडे विरोधी पक्षनेतेपद राहणार नाही. राष्ट्रवादी हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेते पद जाणार आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे विरोधी पक्षनेते असतील असं सांगितलं जातं.

Devendra Fadnavis : फडणवीस सरकारमध्ये अजित पवार विरोधी पक्षनेते?, तर विधानपरिषदेचं नेतृत्व नाथाभाऊंकडे?; खडसे-फडणवीस सामना रंगणार?
फडणवीस सरकारमध्ये अजित पवार विरोधी पक्षनेते?, तर विधानपरिषदेचं नेतृत्व नाथाभाऊंकडे?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 30, 2022 | 12:55 PM

मुंबई: उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांचा सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) हे आज दुपारीच सत्ता स्थापनेचा दावा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिंदे आज दुपारी मुंबईत येणार असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार आहेत. फडणवीस आणि शिंदे हे आजच राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा करणार आहेत. तसेच उद्या फडणवीस आणि शिंदे पद आणि गोपनीयतेची शपथ घेण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. तर फडणवीस आणि शिंदे सरकारमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना विरोधी पक्षात बसणार आहेत. त्यामुळे महाआघाडीचे तिन्ही नेते फडणवीस सरकारला कोणत्या कोणत्या मुद्द्यावर घेरतील हे आगामी काळात ठरणार आहेत.

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये शिवसेनेकडे विरोधी पक्षनेतेपद राहणार नाही. राष्ट्रवादी हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेते पद जाणार आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे विरोधी पक्षनेते असतील असं सांगितलं जातं. तर विधान परिषदेत सर्वात अनुभवी नेते म्हणून एकनाथ खडसेंकडे विधान परिषदेचं नेतेपद दिलं जाणार आहे. खडसे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाल्यास त्यांचा थेट सामना देवेंद्र फडणवीस यांच्याशी होणार आहे. त्यामुळे फडणवीस- नाथाभाऊंची जुगलबंदी विधान परिषदेत पाहायला मिळणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

गटनेते चौधरीच की आदित्य ठाकरे?

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेने त्यांची गटनेतेपदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्याजागी अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती केली. मात्र, आता राजकीय समीकरणे बदलली आहेत. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे अजय चौधरी यांनाच शिवसेना गटनेतेपदी कायम ठेवणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिंदे-फडणवीस सरकारवर अंकूश ठेवण्यासाठी चौधरी यांच्या ऐवजी आदित्य ठाकरे यांच्याकडे गटनेतेपद देणार का? असाही सवाल केला जात आहे. त्यामुळे शिवसेना आता कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

काँग्रेस काय म्हणतेय?

काँग्रेस आमदारांची आज बैठक झाली. त्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पुढील भविष्यकाळाची या बैठकीत चर्चा केली. आता आम्ही सत्ताधारी नाही. विरोधी पक्षात आहोत. विरोधी पक्ष म्हणून काम कसे करायचे याची चर्चा आजच्या बैठकीत झाली. आमदारांना भाषण कसे करायचे? मुद्दे कसे मांडायचे? यावर चर्चा झाली. मतदारसंघातील कामांवर चर्चा झाली, असं थोरात म्हणाले. तसेच दुपारी आम्ही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना भेटणार आहोत, असं त्यांनी सांगितलं.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.