Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अन् चिन्ह कोणाचे? अजित पवार यांनी केला मोठा दावा

Ajit Pawar : राज्याचे नवनिर्विचित उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी आपला वेगळा गट तयार केला. त्यानंतर हा गटच राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचा दावा त्यांनी केला. आपल्यासोबत अनेक जण असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अन् चिन्ह कोणाचे? अजित पवार यांनी केला मोठा दावा
Ajit Pawar
Follow us
| Updated on: Jul 02, 2023 | 4:59 PM

मुंबई : राज्याचे उपमुख्यमंत्री झाल्यानंतर अजित पवार यांनी मोठा दावा केला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आपला दावा केला आहे. आगामी सर्व निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेसचा चिन्हावर आम्ही लढणार आहोत. तसेच विधिमंडळातही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणूनच राहणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. यामुळे उद्धव ठाकरे यांच्याकडून ज्या पद्धतीने शिवसेना गेली, त्या पद्धतीने शरद पवार यांच्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेस जाणार का? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

नरेंद्र मोदी यांना पाठिंबा

राज्याच्या मंत्रिमंडळाचा अजून विस्तार होणार आहे. त्यावेळी अजून काही जणांना संधी मिळणार आहे. सध्या देशपातळीवर अन् राज्याची परिस्थिती लक्षात घेता आम्ही विकासाला महत्व दिले पाहिजे, असे मत आमच्या सर्वच सहकाऱ्यांनी मांडले. त्यामुळे शिंदे सरकारमध्ये सहभागी होण्याचे निर्णय घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा विकास करत आहेत. आपणही त्यास पाठिंबा दिला पाहिजे, असे मत आमचे सर्वच सहकाऱ्यांनी व्यक्त केले, असे अजित पवार यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

तरुणांना संधी देणार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी गेले 24 वर्षांपासून छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल किंवा सगळ्यांनीच शरद पवार यांच्या नेतृत्वात काम करत महत्त्वाची भूमिका निभावली आहे. आगामी काळात तरुणांना संधी देण्याची जास्त आवश्यकता आहे. त्या संदर्भात वेगवेगळे व्हिजन आहे. त्या व्हिजननुसार नवे कार्यकर्ते पुढे आणले गेले पाहिजेत. त्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. मी मागे अडीच वर्षे सरकारमध्ये काम करत असताना आम्ही सगळ्यांनी विकासाचा विचार करुन पुढे जाण्याचा प्रयत्न केला, असे अजित पवार यांनी सांगितले.

सोबत कोण आहेत

आज काही जण पोहोचू शकले नाहीत. काहीजण परदेशात आहे. विशेषत: मी लोकप्रतिनिधींविषयी बोलतो. त्यांच्याशी मी संपर्क साधलाय. त्यांनी मान्यता दिली आहे. काही जण आज संध्याकाळपर्यंत पोहोचतील. अशा पद्धतीने आम्ही हा निर्णय घेतलेला आहे, असे अजित पवार यांनी सांगितले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोडी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.