Ajit Pawar | जिल्हा परिषद, महापालिका, आमदारकी सर्व निवडणूका लढणार ‘या’ चिन्हावर, अजित पवार यांचा अत्यंत मोठा दावा
अजित पवार यांनी नुकताच उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी तीन वर्षांमध्ये ही तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी नुसता बंडच केला नाही तर त्यांनी थेट पक्षाच्या चिन्हावर आणि नावावर देखील दावा केला आहे.
मुंबई : नुकताच आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी असा दावा केला आहे की, सर्व आमदार हे माझ्यासोबत आहेत. काही आता विदेशात असल्याने उपस्थित नाहीत. मात्र, सर्वांसोबत बोलूनच आम्ही हा निर्णय घेतल्याचा दावा अजित पवार यांनी केलाय. काही आमदार रात्रीपर्यंत येतील असेही अजित पवार म्हणाले. इतकेच नाही तर अजित पवार यांनी आता थेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावरच (NCP) दावा ठोकलाय. हा शरद पवार (Sharad Pawar) यांना मोठा धक्काच आहे. अगोदर शिवसेना फुटली आणि आता थेट राष्ट्रवादी काँग्रेस फुटली आहे. महाविकास आघाडीमधून अजित पवार हे बाहेर पडले आहेत.
अजित पवार यांनी शपथविधीनंतर मोठा खुलासा केला आहे. अजित पवार म्हणाले की, काही जण आता वेगवेगळ्या टीका टीप्पणी करणार आहेत. आम्ही टिकांना फार उत्तर देत बसणार नाहीत. आपण कामाशी मतलब ठेवत असतो. महाराष्ट्र राज्याचा सर्वांगिण विकास करणे, मोठ्या प्रमाणात केंद्रीय निधी महाराष्ट्राला कसा मिळेल तो पाहणे आणि महाराष्ट्रातील जनता समाधानी कशी राहील, सर्व घटकाला कशाप्रकारे मदत करता येईल यासाठी हा निर्णय घेतला.
हा निर्णय आमच्या जवळपास बहुतेक आमदार, लोकप्रतिनिधी, नेते आणि आमदाराला मान्य आहे. संपूर्ण पक्ष आमच्यासोबत आहे. उद्याच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणूनच आम्ही या सरकारमध्ये सामील झालो आहोत. तसेच यापुढे कोणत्याही निवडणुका असतील जिल्हा परिषद, तालुका पंचायत, महापालिका, नगरपालिका, आमदारकी, खासदारकी या सर्व निवडणूका आम्ही पक्षाच्या चिन्हावरच लढणार आहोत.
प्रत्येक निवडणूका पक्षाचे नाव आणि चिन्ह असणार आहे. त्यातून पक्ष वाढवण्याचा आणि बळकट करण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. त्याकरिता आम्ही आज मंत्रिमंडळात समाविष्ट झालो आहोत, असे अजित पवार म्हणाले आहेत. म्हणजे काय तर फक्त अजित पवार हे काही आमदारांना घेऊन फुटले नाही तर त्यांनी थेट पक्षाच्या नावावर आणि चिन्हावरच थेट दावा केला आहे.
पुढील काळात सर्व निडणूका पक्षाच्या चिन्हावर लढणार असल्याचेही अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. इतकेच नाही तर अजित पवार यांनी एका शब्दामध्ये सांगितले की, हा निर्णय पक्षातील आमदार, नेते, लोकप्रतिनिधी यांच्यासोबत चर्चा करूनच घेण्यात आलाय. म्हणजेच आता हा प्रश्न उपस्थित होतोय की, या बंडाबद्दल शरद पवार यांना देखील काही कल्पना होती? मात्र, अजित पवार यांनी सर्वांनाच मोठा धक्का दिलाय.