काही लोक काहीही बरळत आहेत, त्यांना समाजात किंमत आहे का?; अजित पवारांची चंद्रकांतदादांवर खोचक टीका

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर टीकास्त्र सोडणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निशाणा साधला आहे. (ajit pawar taunts chandrakant patil over his statement)

काही लोक काहीही बरळत आहेत, त्यांना समाजात किंमत आहे का?; अजित पवारांची चंद्रकांतदादांवर खोचक टीका
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 5:37 PM

पुणे: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर थेट टीकास्त्र सोडणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निशाणा साधला आहे. काही लोक काहीही बरळत आहेत. तोल गेल्यासारखं हे बरळणं सुरू आहे, असं सांगतानाच अशा लोकांना समाजात काही किंमत आहे का?, अशा शब्दात अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे. (ajit pawar taunts chandrakant patil over his statement)

पुणे पदवीधर निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरी-चिंचवडमध्ये आले होते. त्यावेळी ते बोलत होते. काही लोकं काहीही बरळायला लागली आहेत. विशेष करुन विरोधी पक्षनेते खालच्या पातळीवर जाऊन बोलतायत. त्यांना हे कितपत शोभतंय, त्यांना समाजात किती किंमत आहे? पवारांनी एखाद्या व्यक्तीला केंद्रीत करून राजकारण केलं नाही. त्यांनी नेहमी समाजासाठी काम केलं. विरोधी पक्षातील नेते स्वतःचा तोल गेल्यासारखं वक्तव्य करतायत. त्यांना जास्त किंमत देण्याची गरज नाही, असं अजित पवार म्हणाले. आपण कुणाबद्दल बोलतोय. काय बोलतोय, हे सुद्धा या लोकांना कळत नाही. त्यांची तेवढी ऊंची तरी आहे का?, अशी टीकाही त्यांनी केली आहे.

ज्यांची योग्यता नाही. पात्रता नाही. असे लोक शरद पवारांवर टीका करत आहेत. पवार हे दिल्लीतले नेते आहेत. त्यांच्यावर टीका करण्याची यांची योग्यता तरी आहे का? ही तर विनाशकाले विपरीत बुद्धी आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

यावेळी त्यांनी कोरोनापासून सावध राहण्याचा इशारा नागरिकांना दिला आहे. एकदा कोरोना झाला म्हणून आता पुन्हा होणार नाही असं समजू नका. बेफिकीर राहू नका. काळजी घ्या. शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करा. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या, असं ते म्हणाले. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकार सज्ज आहेत. बंद असलेली कोविड सेंटर कायमची बंद केली नाही. कोरोनाची लाट आली तर ही कोविड सेंटर कार्यान्वित होतील, असंही ते म्हणाले. (ajit pawar taunts chandrakant patil over his statement)

संबंधित बातम्या:

भाजप सर्व निवडणुका स्वबळावर लढणार; फडणवीसांनी मनसेसोबत युतीची शक्यता फेटाळली

दिवाळीत झालेल्या गर्दीमध्ये कोरोना चेंगरून मेला, पुण्यातील गर्दीवर अजित पवारांचा खोचक टोला

शेतातल्या ढेकळाने हिमालयाशी तुलना करू नये; अमोल कोल्हेंची चंद्रकांतदादांवर टीका

(ajit pawar taunts chandrakant patil over his statement)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.