‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’, बारामतीत काय घडलं, ज्यामुळे अजितदादांचा पारा चढला!

बारामतीमधल्या एका कार्यक्रमामध्ये एका प्रसंगावरुन अजितदादांचा पारा चढला. उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय, अशा शब्दात त्यांनी काम घेऊन आलेल्या व्यक्तीला सुनावलं.

'उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय', बारामतीत काय घडलं, ज्यामुळे अजितदादांचा पारा चढला!
अजित पवार
Follow us
| Updated on: Jul 25, 2021 | 11:38 AM

बारामती (पुणे) :  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आपल्या रोखठोक स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. सर्वसामान्य असो, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असो किंवा विरोधक, आपल्या मनात जे आहे ते बिनधास्त बोलायचं… मग समोरच्याला राग येऊ किंवा लोभ…. याची फिकीर करायची नाही, असा दादांचा स्वभाव.. एव्हाना हा स्वभाव आता बारामतीकरांनाच नव्हे तर महाराष्ट्राला माहिती झालाय. आज बारामतीमधल्या एका कार्यक्रमामध्ये एका प्रसंगावरुन अजितदादांचा पारा चढला. ‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’, अशा शब्दात त्यांनी काम घेऊन आलेल्या व्यक्तीला सुनावलं.

अजित पवारांचा पारा कशामुळे चढला?

नेहमीप्रमाणे अजित पवार शनिवारी पुण्याच्या आणि रविवारी बारामतीच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात सर्वसामान्य बारामतीकर आपापली कामं घेऊन अजितदादांकडे येत असतात. आज सकाळी बारामतीमधल्या देसाई इस्टेट इथे अजितदादांचा कार्यक्रम सुरु होता. त्यावेळी एक व्यक्ती आपलं काम घेऊन अजितदादांकडे आला. यावेळी आपल्या कामाचं निवेदन त्याने अजितदादांना दिलं.

‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’

‘माझे पैसे एका व्यक्तीकडे अडकले आहेत. या निवेदनाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करतो ती यामध्ये लक्ष घालून मला सहकार्य करावं’, अशी विनंती संबंधित व्यक्तीने अजितदादांकडे केली. निवेदन पाहून अजितदादा भडकले. त्यावर ‘उपमुख्यमंत्री काय वसुली करायला बसला नाय’, अशा शब्दात अजितदादांनी संबंधित व्यक्तीला सुनावलं.

चांगल्या सवयी लावा, नको ती कामे घेऊन येऊ नका

‘बेकायदेशीर व्यवसाय कोण करत असेल, सावकारी करत असेल तर त्याला मोक्का लावला जाईल’, असा सज्जड दम अजितदादांनी यावेळी दिला. ‘चांगल्या सवयी लावा, नको ती कामे घेऊन येऊ नका. उपमुख्यंत्री काय वसुली करायला बसला नाही’, असं अजितदादा म्हणाले.

हे ही वाचा :

अजितदादांच्या वाढदिवसाला रुग्णसेवा, महिनाभर मोफत अँजिओप्लास्टी-अँजिओग्राफी, संदीप क्षीरसागरांचं ‘महाआरोग्य शिबीर’!

अजितदादांच्या स्वभावाचा ‘तो’ गुण सांगत रोहित पवारांकडून खास वाढदिवसाच्या शुभेच्छा

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.