अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालट होण्यापूर्वीच अध्यक्षांचा राजीनामा, 30 वर्षांची पक्षनिष्ठा संपुष्टात आल्याच्या चर्चा

दरम्यान आता वंचितचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते याबाबत काय निर्णय घेतात हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे. (Akola Zilla Parishad Pratibhatai Bhojane resigned from president post)

अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालट होण्यापूर्वीच अध्यक्षांचा राजीनामा, 30 वर्षांची पक्षनिष्ठा संपुष्टात आल्याच्या चर्चा
Akola Zilla Parishad Pratibhatai Bhojane resigned
Follow us
| Updated on: Jun 19, 2021 | 8:10 AM

अकोला : अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालट होण्याच्या चर्चांना गेल्या एप्रिलपासून उधाण आलं आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हा परिषद अध्यक्षा असलेल्या प्रतिभाताई भोजने यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपवला आहे. दोन दिवसांपूर्वी म्हणजे 17 जूनला त्यांनी पदाचा राजीनामा दिला असून 18 जूनला ही बाब समोर आली आहे. त्यामुळे अकोला जिल्हा परिषद वर्तळात एकच खळबळ उडाली आहे. (Akola Zilla Parishad Pratibhatai Bhojane resigned from president post)

20-25 वर्षापासून वंचित बहुजन आघाडीची एकहाती सत्ता

अकोला जिल्हा परिषदेमध्ये गेल्या 20 – 25 वर्षांपासून भारिप बहुजन महासंघ-वंचित बहुजन आघाडीची एकहाती सत्ता आहे. जानेवारी 2020 ला झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा वंचित बहुजन आघाडीच्या सर्वाधिक जागा निवडून आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी जिल्हा परिषदमध्ये सत्ता स्थापन केली.

भांबेरी सर्कल मधून निवडून आलेल्या प्रतिभाताई भोजने या जिल्हा परिषद अध्यक्ष पदी 18 जानेवारी 2020 रोजी विराजमान झाल्या होत्या. मात्र त्यानंतर त्यांच्या विरोधात वारंवार पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी करण्यात आल्या. यानंतर गेल्या एप्रिल महिन्यात जिल्हा परिषदमध्ये खांदेपालट होणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.

प्रकाश आंबेडकरांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

मात्र आता जिल्हा परिषद अध्यक्ष प्रतिभाताई भोजने यांनी 17 जूनला आपल्या पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सादर केला. त्यामुळे या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. तसेच यामुळे जिल्हापरिषद वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान आता वंचितचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ते याबाबत काय निर्णय घेतात हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.

30 वर्षांची पक्षनिष्ठा संपुष्टात?

अकोला जि.प.अध्यक्षा प्रतिभाताई भोजने या भारिप बहुजन महासंघ- वंचित बहुजन आघाडीमध्ये जवळपास गेल्या 30 वर्षांपासून काम करत आहेत. त्यांनी पक्षाच्या महिला आघाडीच्या अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. त्यांनी भांबेरी सर्कलमधून पहिल्यांदा निवडणूक लढवली होती. त्या मतदारसंघातून त्या मोठ्या मताधिक्याने निवडून सुद्धा आल्या होत्या. त्यातच त्यांची जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर वर्णी लागली होती. मात्र आता त्यांनी पदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सादर केला आहे. त्यामुळे गेल्या 30 वर्षांपासूनची पक्षनिष्ठा संपुष्टात तर आली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. (Akola Zilla Parishad Pratibhatai Bhojane resigned from president post)

संबंधित बातम्या : 

ठाण्यात तृतीयपंथीयांसाठी विशेष लसीकरण; ओळखपत्रं नसेल तरीही लस मिळणार!

औरंगाबाद शहरात सक्तीचे लसीकरण ? 21 जूनपासून 18 वर्षांवरील नागरिकांना लस देण्याचे नियोजन

भाजप आंदोलन करायला आजही घाबरली नाही, उद्याही घाबरणार नाही; आशिष शेलारांचा शिवसेनेला इशारा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.