जानकर ते पडळकर… लोकसभेसाठी सर्व धनगर नेते एकवटले!

पुणे : धनगर समाजातील वेगवेगळ्या गटातटात विभागलेले नेते आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकवटण्याची शक्यता आहे. आघाडी किंवा युतीकडून एकही जागा न मिळाल्याने धनगर नेते नाराज आहेत. त्यामुळे सर्व नेते एकत्र येऊन लोकसभा लढवणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्री महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या एबी फॉर्मवर धनगर नेते निवडणूक लढणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली […]

जानकर ते पडळकर... लोकसभेसाठी सर्व धनगर नेते एकवटले!
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:14 PM

पुणे : धनगर समाजातील वेगवेगळ्या गटातटात विभागलेले नेते आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकवटण्याची शक्यता आहे. आघाडी किंवा युतीकडून एकही जागा न मिळाल्याने धनगर नेते नाराज आहेत. त्यामुळे सर्व नेते एकत्र येऊन लोकसभा लढवणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मंत्री महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाच्या एबी फॉर्मवर धनगर नेते निवडणूक लढणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे. पुण्यात हे सर्व नेते येत्या दोन दिवसात एकत्र येतील आणि पुढील निर्णय घोषित करतील.

अनिल गोटे, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, उत्तम जानकर, प्रकाश शेंडगे, सुरेश कांबळे असे सर्व धनगर नेते एकत्र येत लोकसभा निवढणूक लढणार असल्याची माहिती मिळते आहे. कुठल्या मतदारसंघांतून कोण निवडणुकीच्या रिंगणात उतरेल, हे अद्याप निश्चित झाले नाही. मात्र, पुण्यातील बैठकीत यावरही शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ज्या मतदारसंघात धनगर समाजाची लोकसंख्या प्रभावी आहे, तिथे युती आणि आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

निवडणुकीच्या तारखा जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने रविवारी 10 मार्चला लोकसभा निवडणूक 2019 च्या तारखा जाहीर केल्या. लोकसभेच्या 543 जागांसाठी 7 टप्प्यात मतदान होणार आहे. त्यासाठी आचारसंहिता लागू झाली आहे. 11, 18, 23, 29 एप्रिल, तर 6, 12 आणि 19 मे रोजी अशा सात टप्प्यात मतदान होईल. देशभरातील सर्व लोकसभा मतदारसंघाचा निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनिल अरोरा यांनी याबाबतची घोषणा केली.

लोकसभा निवडणूक : तुमच्यासाठी 5 अत्यंत महत्त्वाच्या बातम्या

महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी पहिलं मतदान होईल. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी चार टप्प्यात मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 11 एप्रिलला 7 जागांसाठी, दुसऱ्या टप्प्यात 18 एप्रिलला 10 जागांसाठी, तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिलला 14 जागांसाठी आणि चौथा टप्प्यात 29 एप्रिलला 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.