कंगनाचं एअरपोर्टवर मनसे स्टाईल स्वागत होईल, असं वाटत असेल तर… : अमेय खोपकर

"दररोज सोशल मीडियावर टुकार पोस्ट टाकून खळबळ माजवायची ही अभिनेत्री कंगना रनौतची एक विकृतीच आहे", अशी टीका अमेय खोपकर यांनी केली (Ameya Khopkar on Kangana Ranaut).

कंगनाचं एअरपोर्टवर मनसे स्टाईल स्वागत होईल, असं वाटत असेल तर... : अमेय खोपकर
Follow us
| Updated on: Sep 04, 2020 | 3:41 PM

मुंबई : “दररोज सोशल मीडियावर टुकार पोस्ट टाकून खळबळ माजवायची ही अभिनेत्री कंगना रनौतची एक विकृतीच आहे. या विकृतीमागे कुणाचं डोकं आहे हेही आम्हाला नीट माहिती आहे. एअरपोर्टवर गर्दी जमवून स्वत: प्रकाशझोतात राहायचं, असा कंगनाचा किळसवाणा प्रयत्न आहे”, अशी टीका मनसेचे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी केली आहे. कंगनाला फारसं महत्त्व देण्याची गरज नाही, अशीदेखील भूमिका अमेय खोपकर यांनी ट्विटरवर मांडली आहे (Ameya Khopkar on Kangana Ranaut).

“कंगनाचं एअरपोर्टवर मनसे स्टाईल स्वागत करायला मनसैनिक खूप उत्सूक आहेत, असं कुणाला वाटत असेलही, पण कुणाला किती महत्त्व द्यायचं, हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आम्हाला शिकवलेलं आहे”, असं अमेय खोपकर म्हणाले (Ameya Khopkar on Kangana Ranaut ).

“एअरपोर्टवर गर्दी जमवून स्वत: प्रकाशझोतात राहायचं असा कंगनाचा किळसवाणा प्रयत्न आहे. म्हणून आमच्या दोन मागण्या आहेत. पहिली म्हणजे कंगनावर त्वरित मानसोपचारतज्ज्ञांचे उपचार सुरु करण्यात यावेत. त्याचबरोबर मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणाऱ्या कंगनावर राष्ट्रदोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी आमची दुसरी मागणी आहे”, अशी भूमिका अमेय खोपकर यांनी मांडली.

मुंबई आणि मुंबई पोलिसांबद्दल वक्तव्य केल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतविषयी सर्व स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. “मी 9 सप्टेंबरला मुंबईत येत आहे, कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा” अशा शब्दात कंगनाने ट्विटरवरुन चॅलेंज दिले आहे.

“बरेच जण मला मुंबईला परत न येण्याची धमकी देत ​​आहेत, म्हणून मी आता येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे. मी मुंबई विमानतळावर किती वाजता उतरणार याची वेळ लवकरच सांगेन. कोणाच्या बापात हिंमत असेल तर थांबवा” असा एल्गार कंगनाने केला.

भाजप नेते परवेश साहिब सिंह यांच्या ट्वीटला उत्तर देताना कंगनाने ही घोषणा केली. “कुणाच्या वडिलांची जहागीर आहे का मुंबई? महाराष्ट्रात काय होत आहे उद्धव ठाकरे?” असा प्रश्न त्यांनी विचारला होता.

संबंधित बातम्या :

आम्ही धमकी नव्हे, अ‍ॅक्शन घेतो, महाराष्ट्राच्या अस्मितेवर ड्रग्जच्या गुळण्या सहन करणार नाही, राऊतांचा रनौतवर हल्ला

फडणवीस हे कंगना आणि राम कदमांचे बोलवते धनी, कदमांची नार्को टेस्ट करा : सचिन सावंत

“उचलली जीभ…” मुंबईची PoK शी तुलना, कंगनाला रेणुका शहाणेंनी सुनावलं

“बाईसाहेब मुंबईत पर्यटनासाठी आला होता का?’ नितीन राऊतांचा कंगनाला सवाल

“मुंबईत परत पाऊल ठेवू नकोस” संजय राऊतांनी उघड धमकी दिल्याचा कंगनाचा गंभीर आरोप

आमच्या पोलिसांचा अपमान सहन करणार नाही, निलेश राणेंनी कंगनाला बजावले

श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.