मी परदेशात पळून गेलो नाही, अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करणार; अमोल काळेंचा इशारा
शिवसेना नेते संजय राऊत यांनी अमोल काळे यांच्यावर आरोप केले होते. काळे आणि भाजपचं साटंलोटं असून त्यांनी घोटाळे केल्याचाही आरोप करण्यात आला होता. काळे हे परदेशात पळून गेल्याचा दावाही काही राजकीय नेत्यांनी केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर काळे यांनी थेट टीव्ही9 मराठीकडे खुलासा पाठवला आहे.
नागपूर: शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी अमोल काळे (amol kale) यांच्यावर आरोप केले होते. काळे आणि भाजपचं साटंलोटं असून त्यांनी घोटाळे (scam) केल्याचाही आरोप करण्यात आला होता. काळे हे परदेशात पळून गेल्याचा दावाही काही राजकीय नेत्यांनी केला होता. या सर्व पार्श्वभूमीवर काळे यांनी थेट टीव्ही9 मराठीकडे खुलासा पाठवला आहे. मी एक खासगी व्यावसायिक आहे. मी सरकारचं कोणतंही कंत्राट घेतलेलं नाही. तसेच माझ्याबाबतचा सर्व तपशील आयटीच्या विवरणात दिलेलं आहे, असं सांगतानाच मी परदेशात पळून गेल्याची काही लोकांनी अफवा पसरवली आहे. ज्यांनी ही अफवा पसरवली त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे, असं अमोल काळे यांनी आपल्या निवेदनात म्हटलं आहे.
लेखी स्वरुपाचं निवेदन अमोल काळे यांनी टीव्ही9 मराठीकडे पाठवलं आहे. मी खासगी व्यावसायिक असून मुंबई क्रिकोट असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे. गेले दोन दिवस काही नेत्यांची माझ्या संदर्भातील वक्तव्य पाहण्यात आली. ही सर्व वक्तव्ये पूर्णत: दिशाभूल करणारी आणि माझी बदनामी करणारी आहेत. महाराष्ट्र शासनाचं मी कोणतंही कंत्राट घेतलेलं नाही. माझ्या खासगी व्यवसायाचे तपशील प्राप्तीकर विवरणात दिले आहेत. फक्त संभ्रम निर्माण करण्यासाठी माझी हेतू पुरस्सर बदनामी केली जात आहे. जे नेते माझी बदनामी करत आहेत, त्यांच्यावर मी कायदेशीर कारवाई करणार आहे, असं अमोल काळे यांनी म्हटलं आहे.
राऊत काय म्हणाले होते?
महाआयटी घोटाळ्यातील लोकांना पळवून लावलं आहे. एवढा मोठा घोटाळा आहे. या लोकांना मेहूल चोक्सी, नीरव मोदी आणि विजय मल्ल्याप्रमाणे पळवून लावलं आहे. महाआयटी घोटाळ्यातील काही प्रमुख लोकांना पळवून लावल्याची माझी माहिती आहे. अमोल काळे, ढवंगळे आणि इतर हे कुठे आहेत हे केंद्राला विचारू. 25 हजार कोटींचा हा घोटाळा आहे. त्याचे मनी लॉन्ड्रिंग झालं आहे. ईडी ऐकत असेल तर मी पुन्हा सांगत आहे. आम्ही हा घोटाळा बाहेर काढणार होतो, तेव्हाच ते पळून जाण्याच्या तयारीत होते, असं संजय राऊत यांनी सांगितलं होतं. एक दूधवाला महाराष्ट्रात येतो आणि 7 हजार कोटींचा घोटाळा करतो. कोण आहेत अमोल काळे? असा सवाल त्यांनी केला.
लोंढे काय म्हणाले?
महाआयटी घोटाळ्यातील काही लोक परदेशात पळून गेल्याचं कळतंय. अमोल काळे कुठे आहेत? ते जर भारतात असतील तर त्यांनी समोर यावं, असं काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी म्हटलं होतं.
TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 16 February 2022 pic.twitter.com/XxQIcpHKNw
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 16, 2022
संबंधित बातम्या:
अमोल कोल्हे पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत, कोणत्या वाहिनीवर दिसणार मालिका