एकाच घरात दोन मत प्रवाह, वडिलांपासून विभक्त होणार का?; अमोल कीर्तिकर म्हणतात…

मी गेली अनेक वर्षापासून मी आदित्य ठाकरेंसोबत काम करत आहे. त्यांचा विचार, स्वभाव आणि महाराष्ट्रातील तरुणांसाठीचं धोरण मला पटतं.

एकाच घरात दोन मत प्रवाह, वडिलांपासून विभक्त होणार का?; अमोल कीर्तिकर म्हणतात...
एकाच घरात दोन मत प्रवाह, वडिलांपासून विभक्त होणार का?; अमोल कीर्तिकर म्हणतात...Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 13, 2022 | 2:06 PM

मुंबई: ज्येष्ठ नेते आणि खासदार गजानन कीर्तिकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. तर त्यांचे चिरंजीव अमोल कीर्तिकर यांनी उद्धव ठाकरे यांच्या गटासोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. अमोल कीर्तिकर यांनी आज खासदार संजय राऊत यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी राऊत यांच्याशी चर्चा केली. नंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. वडिलांनी घेतलेला निर्णय त्यांचा वैयक्तिक आहे. त्यावर मी बोलणार नाही. पण मी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार आहे. ते देतील ती जबाबदारी पार पाडणार आहे आणि पक्ष संघटना वाढवणार आहे, असं अमोल कीर्तिकर यांनी सांगितलं.

तुम्ही एका पक्षात आणि वडील दुसऱ्या पक्षात आहेत. अशावेळी तुम्ही कुटुंबापासून विभक्त होणार आहात का? असा सवाल अमोल कीर्तिकर यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. कौटुंबिकरित्या विभक्त होण्याचा प्रश्न येत नाही. अनेक कुटुंब राजकारणात आहेत. अनेक घरात वेगवेगळ्या मतप्रवाहाचे लोकं असतात. आमच्या घरातही तसं असू शकतं, असं अमोल कीर्तिकर यांनी स्पष्ट केलं.

हे सुद्धा वाचा

राजकारणातील वाद घरापर्यंत येऊ नये हे प्रत्येकाचं मत असतं. आमच्या घरातही तेच मत आहे. त्यांनी जो निर्णय घेतला तो त्यांच्या वैयक्तिक गोष्टींसाठी घेतला असला तरी मी माझ्या निर्णयावर ठाम आहे, असं अमोल कीर्तिकर यांनी सांगितलं.

कालही उद्धव ठाकरेंसोबत होतो. आजही आहे. आणि पुढेही राहील. गजानन कीर्तिकरांचा निर्णय वैयक्तिक आहे. मी शिवसेनेसोबत आहे, हे मीउद्धव ठाकरे यांना सांगितलं आहे. शिवसेना वाढवण्यासाठी जी जबाबदारी मिळेल ती पार पाडेल, असं त्यांनी स्पष्ट केलं.

प्रत्येकाची वैयक्तिक मतं असतात. त्यानुसार ते निर्णय घेत असतात. त्यानुसार वडिलांनी निर्णय घेतला आहे. त्यामुळे त्यावर आता बोलायचं नाही. वडिलांची राजकीय कारकिर्द माझ्या जन्माच्या आधीपासून सुरू आहे.

त्यामुळे त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही. शिंदे गटात जाण्याचा त्यांचा निर्णय वैयक्तिक असेल. त्यांच्याशी बोलला तर तेच त्यावर सांगतील. पण माझा निर्णय योग्य आहे, असं ते म्हणाले.

मी गेली अनेक वर्षापासून मी आदित्य ठाकरेंसोबत काम करत आहे. त्यांचा विचार, स्वभाव आणि महाराष्ट्रातील तरुणांसाठीचं धोरण मला पटतं. त्यामुळे मी त्यांच्यासोबतच काम करणार. वडिलांच्या निर्णयाशी असहमत आहे. त्यामुळे मी आदित्य ठाकरेंसोबत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

एखादा कार्यकर्ता इकडे तिकडे गेला तरी आपली घालमेल होते. ते माझे वडील असल्याने माझीही घालमेल झाली. पण राजकारणात माझे काही निर्णय आहेत. माझी काही वैयक्तिक मते आहेत. त्यावर मी ठाम आहे. त्यामुळे माझी चलबिचल होणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.