“अमृता फडणवीस यांना काम नाही, भाजपने त्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नेमणूक करावी” मनिषा कायंदेंचा टोला

अमृता फडणवीस यांना सध्या कोणतंही काम नाही. त्यामुळे भाजपने यांची पक्षाच्या प्रमुख प्रवक्तेपदी नेमणूक करावी, असा खोचक टोला शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी लगावला.

अमृता फडणवीस यांना काम नाही, भाजपने त्यांची पक्षाच्या प्रवक्तेपदी नेमणूक करावी मनिषा कायंदेंचा टोला
MANISHA KAYANDE AMRUTA FADNAVIS
Follow us
| Updated on: Aug 05, 2021 | 7:20 PM

मुंबई : “अमृता फडणवीस यांना सध्या कोणतंही काम नाही. त्यामुळे भाजपने त्यांची पक्षाच्या प्रमुख प्रवक्तेपदी नेमणूक करावी,” असा खोचक टोला शिवसेना नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी लगावला. पुणे मेट्रोच्या प्रोजेक्टवरुन अमृता फडणवीस (Amrita Fadnavis) यांनी राज्य सरकारवर टीका केली. काम एक करतं आणि हार दुसरेच घालून जातात, अशा शब्दात त्यांनी राज्य शासनावर निशाणा साधला. तसेच कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा, असा सल्लाही अमृता फडणवीस यांनी पुणेकरांना दिला होता. त्यांच्या या वक्तव्यानंतर मनिषा कायंदे यांनी वरील भाष्य केलं. (Amrita Fadnavis currently has no work BJP should appoint him as partys chief spokesperson said Shiv Sena leader Manisha Kayande)

मनिषा कायंदे काय म्हणाल्या

“आमच्या लाडक्या अमृता फडणवीस यावेळी पुण्याला फिरायला गेल्या होत्या. तिथं त्यांनी नेहमीप्रमाणे राजकीय वक्तव्य केलं. सध्या त्यांना कोणतेही काम नाही. त्यामुळे भारतीय जनता पक्षाने त्यांची प्रमुख प्रवक्तेपदी नेमणूक करावी,” असे मनिषा कायंदे म्हणाल्या.

अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

“हॅन्डलूम जगभरात आहे. हॅन्डलूम 125 देशात एक्स्पोर्ट होतं. शेती नंतर हातमाग हा सर्वात मोठा उद्योग आहे. 77 टक्के या कामात स्त्रिया आहेत. 7 ऑगस्ट 2015 पासून हातमागदिन साजरा केला जातो.”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हातमागाचं महत्व ओळखले आहे. स्वदेशी चळवळ 7 ऑगस्टला सुरु झाली होती. त्याचमुळे 7 ऑगस्ट ला हातमागदिन साजरा केला जातो. पैठणीचं कारोबारही मोठा आहे. देशातले स्त्रिया पैठणी ऐटीने घालतात. हॅन्डलूमचं क्षेत्रही चांगलं वाढत आहे. हँडलूमच्या वस्तू फक्त जपून ठेवायच्या नाहीत त्या वापरायच्या,” असं अमृता फडणवीस म्हणाल्या. तसेच पुणे मेट्रोच्या प्रोजेक्टवरुनही अमृता फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली. काम एक करतं आणि हार दुसरेच घालून जातात, अशा शब्दात त्यांनी राज्य शासनावर निशाणा साधला.

इतर बातम्या :

Breaking : चंद्रकांत पाटील मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार! राज्याच्या राजकारणाला नवं वळण मिळणार?

Gold Rates | खुशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या नवी किंमत

Corona Delta Variant : कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेन्सिंग लॅब, कोरोना विषाणुच्या व्हेरीएंटवर संशोधन होणार

(Amrita Fadnavis currently has no work BJP should appoint him as partys chief spokesperson said Shiv Sena leader Manisha Kayande)

अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर
अजितदादा तिसऱ्या दिवशी विधिमंडळात प्रकटले? नॉटरिचेबल असण्याच कारण समोर.
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?
'वन नेशन, वन इलेक्शन' रखडलं, सरकारच्या बाजूनं अन् विरोधात किती जण?.
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी
आधी अपहरण नंतर सरपंच संतोष देशमुखांची हत्या...मस्साजोगची A टू Z स्टोरी.
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?
मंत्रिमंडळ विस्तारात नाराजीरावांचा पूर, खातेवाटपाच्या वेळी काय होणार?.
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?
भुजबळांचं मंत्रिपद दादांनी मंत्रिपद नाकारलं? भुजबळ मोठा निर्णय घेणार?.
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.